30 November 2020

News Flash

शरद पवारांच्या निमित्ताने तुम्ही तर मला एका विद्यापीठाच्या बाजूला बसवलं- आदित्य ठाकरे

"आठ महिन्यांनंतर कोविड सेंटर वगळता पहिल्यांदाच एखाद्या उद्घाटनाला आपण उपस्थित"

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज पुण्यात अमनोरा पार्क येथे छत्रभुज नरसी आंतरराष्ट्रीय स्कूलच्या भूमिपूजन समारंभास उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी शरद पवारांच्या निमित्ताने मला एका विद्यापीठाच्या बाजूला बसण्याची संधी मिळाली म्हणत आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. आठ महिन्यांनंतर कोविड सेंटर वगळता पहिल्यांदाच एखाद्या उद्घाटनाला आपण उपस्थित असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं.

“सध्याच्या आव्हानात्मक काळात मागील आठ महिन्यात पहिल्यांदाच मी कोविड सेंटर सोडून इतर कोणत्या वेगळ्या गोष्टीच्या उद्घाटनाला आलो आहे. त्यातही तुम्ही तर आज मला एका विद्यापीठाच्या बाजूला बसवलं आहे ते म्हणजे शरद पवार. त्यांना ज्यावेळी भेटतो, तेव्हा प्रत्येक वेळी काही ना काही शिकण्यास मिळतं,” असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.

“प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा अधिकार आहे. मात्र प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अधिकार असावा, या संकल्पनेवर काम करणं महत्त्वाचं आहे. नव्या महाराष्ट्राचे स्वप्न पाहत असताना केवळ रट्टा मारत पूर्ण केलेले शिक्षण नव्हे, तर मुलांमधील उत्सुकतेला योग्य मार्ग उपलब्ध करून देत त्यांच्या नवसंकल्पनांना व्यासपीठ देणे आम्ही गरजेचे मानतो. भविष्यात अशीच शिक्षण व्यवस्था उभारण्यावर आमचा भर राहणार असल्याचं,” यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 8:18 pm

Web Title: shivsena aditya thackeray on ncp sharad pawar svk 88 sgy 87
Next Stories
1 “….तुमच्या वयाला शोभत नाही,” शरद पवारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिला सल्ला
2 अर्णब गोस्वामींच्या अटकेवर पहिल्यांदाच शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले….
3 पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेपाळी तरुणीचं सात महिन्यांपासून लष्करी अधिकाऱ्यांच्या क्वार्टरमध्ये वास्तव्य
Just Now!
X