jaitapur_inजैतापूर येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेतर्फे गुरुवारी भारतीय अणुऊर्जा महामंडळाच्या येथील विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मात्र, कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीसांनी खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी आणि आमदार उदय सामंत यांच्यासह सर्व शिवसैनिकांना प्रकल्पापासून एक किलोमीटर आधीच ताब्यात घेतले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी लागू जमावबंदी आदेश लागू केले होते. मात्र, त्याला न जुमानता शिवसैनिकांनी गुरुवारी सकाळी मोर्चा काढला.
राऊत, साळवी आणि सामंत या तिघांनी या मोर्चाचे नेतृत्त्व केले. या मोर्चामध्ये शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. या प्रकल्पाविरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. शिवसेनेने यापूर्वी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे पोलीसांनी जमावबंदी आदेश जारी केला असल्याचे जिल्हा प्रशासनाने नमूद केले. प्रत्यक्षात सुमारे चार वर्षांपूर्वी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर तसा एकही प्रकार जिल्हय़ात घडलेला नाही.