02 March 2021

News Flash

खडसेंच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेकडून फटाके वाजवून जल्लोष

जळगावमध्ये एकनाथ खडसे आणि शिवसेना यांच्यात कमालीचा वाद आहे.

एकनाथ खडसे यांनी शनिवारी गैरव्यवहारांच्या आरोपांवरून राजीनामा दिल्यानंतर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने जळगावमध्ये फटाके वाजवून आनंद साजरा केला. तर, दुसरीकडे मुक्ताईनगरमध्ये खडसे समर्थक आणि नागरिकांनी सर्व दुकाने बंद करत त्यांच्या राजीनाम्याचा निषेध केला. खडसेंचा बालेकिल्ला असलेला मुक्ताईनगर मतदारसंघातही शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मात्र, जळगावमधील शिवसैनिकांनी फटाके फोडून आपला आनंद साजरा केला. जळगावमध्ये एकनाथ खडसे आणि शिवसेना यांच्यात कमालीचा वाद आहे. त्यामुळेच शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यामुळे आनंद झाला नाही. मात्र, सध्याच्या परिस्थितीत हा निर्णय आवश्यक होता, अशी प्रतिक्रिया सेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
जळगावमध्ये खडसेंचे कार्यकर्ते आक्रमक 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 4:53 pm

Web Title: shivsena celebrates eknath khadse resignation in jalgaon
टॅग : Bjp,Eknath Khadse
Next Stories
1 जळगावमध्ये खडसेंचे कार्यकर्ते आक्रमक
2 ‘शर्तभंग’प्रकरणी कारवाईला खडसेंचा खो
3 रत्नागिरी जिल्ह्य़ात पावसाची सर्वदूर हजेरी
Just Now!
X