News Flash

मंत्रिमंडळ बैठकीत उद्धव ठाकरे सरकारचा निर्णयांचा धडाका

महाविकास आघाडी सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज पार पडली असून यावेळी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले

महाविकास आघाडी सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज पार पडली असून यावेळी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. खातेवाटप अद्यापही झालं नसल्याने उद्धव ठाकरे सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासह शपथ घेतलेल्या मंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव मान्य झाला असल्याची माहिती शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीत एकूण पाच निर्णय घेण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त ३५०० कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या विविध वित्तीय करारांना मुद्रांक शुल्क माफी देण्याचाही निर्णय घेण्यात आला.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय 

1. राज्यातील दुय्यम न्यायालयातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा नंतर नियुक्त झालेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मान्यता.
2. महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत वाढ करून 5 हजार 350 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता.
3. महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त 3500 कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय.
4. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या विविध वित्तीय करारांना मुद्रांक शुल्क माफी.
5. गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीस प्रभावीपणे आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या कोणत्याही महसुली अधिकाऱ्यास आता अधिकार. अध्यादेशाचे अधिनियमात रुपांतर करण्यास मान्यता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 4:56 pm

Web Title: shivsena cm uddhav thackeray cabinet meeting mahavikas aghadi nagpur samruddhi mahamarg sgy 87
Next Stories
1 समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देणार, मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मान्य
2 …म्हणून ‘स्वाभिमानी’ने घेतला कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय
3 अवघ्या तीन तासात पंकजा मुंडेंच्या पोस्टरवर ‘कमळ’
Just Now!
X