28 February 2021

News Flash

करोनाच्या लक्षणात पोटदुखीसुद्धा आहे का? उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

आमचं सरकार अजिबात गोंधळलेलं नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. (संग्रहित छायाचित्र)

करोनाची परिस्थिती हाताळण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याची टीका भाजपा नेत्यांकडून वारंवार केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपा नेत्यांकडून होणाऱ्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता करोनाच्या लक्षणात पोटदुखी आहे का ? हे डॉक्टरांच्या टास्क फोर्सला विचारणार आहे असा टोला लगावला. महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या वेबसंवाद कार्यक्रमाची सांगता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीने झाली. यावेळी ते बोलत होते.

सरकार अजिबात गोंधळलेलं नाही
हे सरकार गोंधळलेलं आहे अशी टीका वारंवार केली जाते असं विचारलं असता उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, “जे आरोप करत आहेत त्यांनी देशातील इतर राज्यं काय करत आहेत याकडे पहावं. आपण कुठेही गोंधळलेलो नाही. दिशा ठरवून प्रत्येक पाऊल योग्य दिशेने टाकत आहोत. आपण मुंबईत तज्ञ डॉक्टारंचा टास्क फोर्स नेमला आहे. देशात असा टास्क फोर्स अजून कुठेही नेमलेला नाही. टास्क फोर्समध्ये सर्व तज्ञ डॉक्टर आहेत. या डॉक्टरांनी स्वत: रुग्णांवर करोना उपचार केले आहेत. गेले दोन महिने अभ्यास करुन या डॉक्टरांनी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. रुग्ण आल्यावर त्याला काय औषध दिलं पाहिजे ? लक्षणं वाढत असतील तर काय केलं पाहिजे ? यासंबंधी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत”.

“प्रशासकीय अनुभव नसल्याची टीका करणारे अनुभवसंपन्न गोंधळून आरोप करत आहेत. मी मोकळेपणाने काम करत असून मिळालेल्या सूचना ऐकत असून योग्य सूचना देत आहे, आत्मविश्वास आहे पण अजिबात गोंधळलेलो नाही,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. चुका काढणं, दोष दाखवणं यापेक्षा बाहेर कसं पडता येईल याचा विचार करत आहे असंही यावेळी ते म्हणाले आहेत.

केंद्र सरकारकडून आपल्याला योग्य त्या सूचना मिळत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. “केंद्र, आयसीएमआरकडून रोज नव्या सूचना, झालेले बदल, मार्गदर्शक तत्वे नेहमी मिळत असतात,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

हे तीन पक्षांचं सरकार आहे अशी टीका केली जाते असं विचारलं असता उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, “हो आमच्या तीन लोकांनी मिळून पत्रकार परिषद घेतली. तीन पक्ष एकत्र आले तर आघाडीचा डाव आणि एकटे आले तर आघाडीत एकता नाही अशी टीका होते. राजकारणात असं होत असतं. पण माझं संपूर्ण लक्ष करोनावर आहे. सगळं लक्ष आरोग्याच्या सुविधा निर्माण करणं, करोनाचा प्रसार कमी करणं यावर आहे”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2020 2:39 pm

Web Title: shivsena cm uddhav thackeray on critisim from bjp sathicha ghazal webinar by loksatta sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोनाबरोबर जगायला शिका असं म्हणणं ही आपली अपरिहार्यता : उद्धव ठाकरे
2 केवळ ताप मोजणं ही मोठी चूक; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं करोना प्रसाराचं कारण
3 मुख्यमंत्री म्हणजे काही चित्रपटसृष्टीतील हिरो नाही : उद्धव ठाकरे
Just Now!
X