11 July 2020

News Flash

खूनप्रकरणी हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुखासह आठजणांना जन्मठेप

जमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारीत विठ्ठलअप्पा तोडकर यांचा निर्घृण खून केल्याच्या प्रकरणात शिवसेनेचा हिंगोली जिल्हाप्रमुख संतोष लक्ष्मण बांगर, त्याचा भाऊ नगरसेवक श्रीराम बांगर याच्यासह आठजणांना जन्मठेप

| October 16, 2012 07:13 am

जमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारीत विठ्ठलअप्पा तोडकर यांचा निर्घृण खून केल्याच्या प्रकरणात शिवसेनेचा हिंगोली जिल्हाप्रमुख संतोष लक्ष्मण बांगर, त्याचा भाऊ नगरसेवक श्रीराम बांगर याच्यासह आठजणांना जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश एम. व्ही. यवतीकर यांनी सुनावली. हिंगोली तालुक्याच्या पारडा शिवारातील शेत गट क्र. २६७ मधील जमीन २५ वर्षांपूर्वी आरोपी कृष्णाराव मस्के याच्याकडून तोडकर यांनी खरेदी केली होती. त्यात २० गुंठे जमीन जास्त गेली. ती परत करा, अशी मागणी मस्के करीत होते. या वादातून २३ फेब्रुवारी २००७ रोजी कृष्णाराव व विठ्ठलअप्पा यांच्यात वाद झाला व विठ्ठलअप्पा गंभीर जखमी झाला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी संतोष लक्ष्मण बांगर, त्याचा भाऊ नगरसेवक श्रीराम बांगर, कृष्णाराव मस्के, केशव मस्के, कोंडबाराव मस्के, गोपुराव मस्के, मारोतराव मस्के, बबन मस्के यांना जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. नानाराव मस्के, केशव मस्के, संतोष मस्के या तिघांची पुराव्याअभावी मुक्तता झाली.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2012 7:13 am

Web Title: shivsena distict president punish life imprisonment
Next Stories
1 महाड ग्रामदैवत जाकमाता देवी नवरात्रोत्सवानिमित्त ‘महाड व्हिजन-२०२०’
2 नांदेड-वाघाळामध्ये काँग्रेसचा झेंडा
3 कल्याणच्या पोटनिवडणुकीत शिवसेना विजयी
Just Now!
X