News Flash

शिवसेना मुंडावळ्या बांधून वाट बघत बसलेली नाही, संजय राऊत यांचा भाजपाला टोला

'आमचं मॅरेज ब्युरो नाही, शिवसेना शिवसेना आहे'

संग्रहित छायाचित्र

शिवेसना मुंडावळ्या बांधून बसलेली नाही असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे. भाजपाकडून युतीचा प्रस्ताव येत असल्याच्या चर्चेवर बोलताना त्यांनी हा टोला लगावला. आमचं मॅरेज ब्युरो नाही, शिवसेना शिवसेना आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

एकीकडे लोकसभा निवडणुकीसाठी विरोधक एकत्र येऊन निवडणूक लढण्याची तयारी करत असताना राज्यात अद्यापही शिवसेना-भाजपाच्या युतीबाबत निर्णय झालेला नाही. भाजपा शिवसेनेवर टीका करणं टाळत असताना शिवसेना नेते मात्र भाजपावर टीका करताना दिसत आहेत. यामुळे नेमका युतीचा निर्णय होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच आता संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चा अजून लांबण्याची शक्यता आहे.

‘आम्ही स्वबळाची घोषणा केली असून प्रस्ताव घ्यायला बसलेलो नाही. हल्ली सगळ्यांनाच शिवसेनेशी जवळीक साधावं असं वाटत आहे. पण शिवसेना येथे मुंडावळ्या बांधून प्रपोजलची वाट पाहत बसलेली नाही’, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान सुत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांत युतीच्या चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 3:00 pm

Web Title: shivsena is not waiting for alliance proposal from bjp says sanjay raut
Next Stories
1 सत्ता आल्यास गोपीनाथ मुंडे यांच्या हत्येची सखोल चौकशी करणार: जयंत पाटील
2 औरंगाबाद : सागर मुगलेकडे राजपथवरील एनसीसीच्या पथकाचे नेतृत्व
3 राहुल गांधींनी कधीही खोटी आश्वासनं दिली नाहीत: संजय राऊत
Just Now!
X