05 August 2020

News Flash

भाजपा-मनसे युतीवर संजय राऊत यांनी दिलं खास शैलीत उत्तर, म्हणाले…

पुण्यात एका कार्यक्रमात दिला भाजपाला सल्ला

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रानं शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं महाविकास आघाडीचं राजकीय समीकरण उदयाला आलेलं बघितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता नव्या युतीची चर्चा बाळस धरू लागली आहे. भाजपा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे. या नव्या युतीवर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी खास त्यांच्या शैलीत भाजपाला सल्ला दिला.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेनेनं भाजपासोबतची युती तोडली. त्यानंतर शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत आघाडी करत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे सर्वाधिक आमदार असूनही भाजपाला विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारावी लागली. या सगळ्या राजकीय घडामोडींनंतर पुन्हा नव्या युतीच्या चर्चेनं फेर धरला आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट झाली. या भेटीनंतर भाजपा-मनसे एकत्र येणार अशा शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना या सगळ्या राजकीय घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, “भाजपानं मनसेला सोबत घेतलं तर मग हिंदुत्वाचं काय? उत्तर प्रदेश, बिहारसह उत्तरेकडील राज्यात भाजपा काय सांगणार? याचा विचार त्यांनी करायला हवा. माणसाने झेपेल ते करावे, त्यामुळे ही युती करणं त्यांना झेपणार आहे का, हे पाहणे गरजेचे आहे,” असा सल्ला त्यांनी भाजपाला दिला.

अजित पवारांनीही दिलं होत भन्नाट उत्तर –

“राजकीय जीवनात काम करत असताना अनेक जण अशा गोपनीय बैठका घेत असतात. चर्चा करत असतात. आपला पक्ष आणि जनाधार वाढण्यासाठी काम करत असतात. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची बैठक झाल्याचं मी वृत्तपत्रात वाचलं. पण तुम्ही जे ठिकाण सांगत आहात, त्यावरून ती बैठक झाली असावी, असा माझा अंदाज आहे. कारण मागे एकदा त्याठिकाणी मी सुद्धा राज ठाकरे यांच्याबरोबर गुप्त बैठक घेतली होती,” असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना काही दिवसांपूर्वी केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 2:50 pm

Web Title: shivsena leader sanjay raut reply on bjp mns alliance bmh 90
Next Stories
1 “पत्रकार म्हणून मोदींना एकच सांगेन…”; संजय राऊतांकडून मोदींना सल्ला
2 काँग्रेस व गांधी घराणं हिंदुत्ववादीच – संजय राऊत
3 “माझं ते माझं तुझं ते माझ्या बापाचं असं भाजपाचं राजकारण आहे”; राऊतांचा टोला
Just Now!
X