30 March 2020

News Flash

शिवसेनेत यायचेय तर लवकर या – उध्दव ठाकरे

ज्यांना शिवसेनेत यायचे आहे त्यांना कोणी अडवलेले नाही. त्यांनी लवकरात लवकर शिवसेनेत प्रवेश करावा, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले.

| July 13, 2014 02:55 am

ज्यांना शिवसेनेत यायचे आहे त्यांना कोणी अडवलेले नाही. त्यांनी लवकरात लवकर शिवसेनेत प्रवेश करावा, असे वक्तव्य शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले. सांगलीत घेण्यात आलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यादरम्यान ते बोलत होते.
राष्ट्रवादीचे नेते व सार्वनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी भुजबळ आणि केसरकर यांना टोला लावला. ज्यांना शिवसेनेत यायचयं त्यांनी लवकरात लवकर यावे, वेळ लावल्यास शिवसेनेची दार बंद केली जातील. विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिक सज्ज असल्याचे ठाकरे यांनी या वेळी नमूद केले. दरम्यान, आज राष्ट्रवादीचे बंडखोर नेते दीपक केसरकर यांनी पक्षाला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. आता भुजबळही केसरकरांच्या वाटेवर चालतील का याकडे सगळ्यांचेच लक्ष्य लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2014 2:55 am

Web Title: shivsena melava in sangli
Next Stories
1 पोलिसांनी देशभक्तीची प्रतिमा निर्माण करावी – आर. आर.
2 सोलापुरात काँग्रेसमध्ये वादळापूर्वीची शांतता
3 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
Just Now!
X