News Flash

भाजपा नेते किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा मानहानीचा दावा

रविंद्र वायकर यांनी मानहानीची ९ पानांची नोटीस याआधीच किरीट सोमय्यांना पाठवली आहे

संग्रहित

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोंटीचा मानहानीचा दावा ठोकण्यात आला आहे. शिवसेना आमदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नी मनिषा वायकर यांनी किरीट सोमय्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. किरीट सोमय्या यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे आपल्या प्रतिमेला धक्का बसल्याचा आरोप करत वायकर दांपत्याने १०० कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. तसंच प्रकरण न्यायप्रविष्ट असताना किरीट सोमय्या यांना कोणत्याही प्रकारे प्रतिमा खराब करण्यापासून रोखण्यात यावं अशी मागणीही करण्यात आली आहे. Live Law ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

किरीट सोमय्या यांनी सोशल मीडिया तसंच अनेक वृत्तवाहिन्यांवर वायकर दांपत्यावर जाहीरपणे आरोप केले आहेत. रवींद्र वायकर यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची खोटी माहिती दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर वायकर दांपत्याने मानहानीचा खटला दाखल केला आहे.

उद्धव ठाकरेंकडून जमीन खरेदी प्रकरणात पदाचा गैरवापर; सोमय्या यांचा गंभीर आरोप

किरीट सोमय्या यांनी केलेली वक्तव्यं बेजबाबदार आणि खोटी असून राजकीय फायदा मिळवण्यासाठी केली असल्याचं वायकर दांपत्याने म्हटलं आहे. वायकर यांच्या म्हणण्यानुसार, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी किरीट सोमय्यांकडून या गोष्टी रचण्यात आल्या आहेत. आपल्या पक्षातील महत्व कमी होत असल्यानेच ते वाढवण्यासाठी किरीट सोमय्या आधारहीन आरोप करत महाराष्ट्राच्या नेतृत्वाला अप्रत्यक्षपणे टार्गेट करत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

रश्मी ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयांकडून घेतली जमीन; किरीट सोमय्या यांचा गंभीर गौप्यस्फोट

किरीट सोमय्या यांनीदेखील ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. “संजय राऊत यांची “शेवटची चेतावणी”…प्रताप सरनाईक ची 100 कोटीची नोटीस…रविंद्र वायकरचा 100 कोटीचा दावा…वाह रे ठाकरे सरकार,” असं ट्विट त्यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या कुटुंबियांनी मुरूड तालुक्यातील कोर्लई येथे जमीन खरेदी केली असून गैरव्यवहार केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप आहे. या जमीन खरेदी व्यवहाराबद्दल त्यांनी ३ मार्चला रेवदंडा येथील पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. जमिनींच्या दस्तऐवजात छेडछाड करण्यात आलेली आहे. वन कायद्याचा भंग, वनजमिनीवर अतिक्रमण करण्यात आल्याचा दावाही सोमय्या यांनी तक्रारीत केलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप आहे.

अलिबागमधील कोर्लाई येथील जमिनीवर १९ बंगले असल्याचा आणि ही माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात लपविण्यात आल्याचाही उल्लेख सोमय्यांनी केला आहे. तसंच मुंबईत महाकाली गुंफा जमीन घोटाळ्यात रविंद्र वायकर यांना अविनाश भोसले व शाहीद बलवा यांच्याकडून २५ कोटींचा मोबदला मिळाल्याचा सोमय्यांचा दावा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 2:31 pm

Web Title: shivsena mla ravindra waikar wife manisha waikar file 100 crore defamation suit against ex bjp mp kirti somaiya sgy 87
Next Stories
1 “हातावर पोट असणाऱ्यांच्या उदरनिर्वाहाची सोय करा मगच लॉकडाउनचा विचार करा”
2 उद्धव ठाकरेजी, थोडा अभ्यास करत चला; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला
3 नक्षलवाद्यांनी दिली गडचिरोली बंदची हाक
Just Now!
X