News Flash

VIDEO: करोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी शिवसेना आमदाराने मोडली ९० लाखांची एफडी

"ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्या लोकांसाठी काम नाही करायचे तर मग अर्थ काय?"

राज्यात एकीकडे करोनाचा कहर वाढत असताना दुसरीकडे आरोग्य सुविधांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर, बेड्स मिळत नसल्याने सर्वसामान्यांना धावपळ करावी लागत आहे. यावेळी अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. राज्य सरकारने करोनाशी लढण्यासाठी आमदारांच्या निधीतील रक्कम वापरण्याचाही आदेश दिला आहे. यादरम्यान हिंगोलीमधील शिवसेना आमदार संतोष बागर यांनी सर्वांमसोर आदर्श ठेवणारी कामगिरी केली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विदारक स्थिती असून यामध्ये हिंगोलीचाही समावेश आहे. मागील आठवड्यात करोना रुग्णांसाठी उपचारांमध्ये महत्त्वाचे असणारे रेमडेसिविर इंजेक्शन जिल्ह्यात कुठेही उपलब्ध नव्हते. त्यामुळे करोना रुग्ण व नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला होता आहे. प्रशासनाने इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु जिल्ह्यातील कोणताही औषध वितरक एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवण्यास असमर्थ होता. यावेळी हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी करोना रूग्णांसाठी स्वतःच्या बचतीचे बँकेतील तब्बल ९० लाखांचे फिक्स डिपॉझिट मोडून हिंगोलीतील एका औषध वितरकाला मदत केली आणि रेमडेसिविर इंजेक्शन हिंगोली जिल्ह्यासाठी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

संतोष बांगर यांच्या मदतीमुळे तब्बल दहा हजार इंजेक्शन्स जिल्ह्यातील करोना रुग्णांसाठी टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत आहेत. “ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्या लोकांसाठी काम नाही करायचे तर मग अर्थ काय? आम्ही शिवसैनिक आहोत, शिवसेना ही कायम सामान्यांना संकटात मदत करायला अग्रभागी असते,” अशी प्रतिक्रिया संतोष बांगर यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 2:05 pm

Web Title: shivsena mla santosh bangar breaks fixed deposit of 90 lakhs for corona patients sgy 87
Next Stories
1 वासनेची भूक मिटवण्यासाठी कुत्र्यांवर लैंगिक अत्याचार; नालासोपाऱ्यात एकाला अटक
2 वर्धा : रुग्णांच्या नातेवाईकांना औषधासाठी दहा तास फिरावं लागलं, मात्र…
3 “हे आम्हाला आवडलं नाही,” मोफत लसीकरणावरुन बाळासाहेब थोरांताची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका
Just Now!
X