परभणीमधील शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी सुपारी देण्यात आली आहे. संजय जाधव यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. नानलपेठ पोलीस ठाण्यात संजय जाधव यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली असून दोन कोटींची सुपारी देण्यात आली असल्याचा दावा केला आहे.

आपली हत्या करण्यासाठी नांदेडमधील रिदा गँगला दोन कोटींची सुपारी देण्यात आली असल्याचं खासदार संजय जाधव यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. परभरणीमधील एका मोठ्या व्यक्तीकडून ही सुपारी देण्यात आली असल्याचं संजय जाधव यांचं म्हणणं आहे. संजय जाधव यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. पोलिसांकडून चौकशी समिती नेमण्यात आली असून संपूर्ण माहिती घेतल्यानंरच गुन्हा दाखल केला जाणार आहे.