राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची लोकसत्ताचे सहयोगी संपादक संदिप आचार्य आणी लोकसत्ता डॉट कॉमचे संपादक योगेश मेहेंदळे यांनी घेतलेली Exclusive मुलाखत. शरद पवार यांची सत्तास्थापनेत काय भूमिका होती? तीन पक्षांचे सरकार कसे चालणार? मुख्यमंत्रिपदाबाबत खरं कोण बाेलतंय, अमित शहा की उद्धव ठाकरे? आदित्य ठाकरे मंत्री होणार का? राज-उद्धव एकत्र येतील का? अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी रोखठोक उत्तरे दिली.