काँग्रेसचे दिल्लीतील नेते मल्लिकार्जुन खर्गे हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रभारी आहेत. ते मूळचे कर्नाटकातील गुलबर्ग्याचे आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार बनवण्यात खर्गे यांची अत्यंत महत्वाची भूमिका होती. आम्ही त्यांच्याबरोबर शुद्ध मराठीतच बोलतो असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.

गोगटे रंगमंदिर येथे संजय राऊत यांची प्रगट मुलाखत सुरु आहे. आमच्या मनात खोट नाही, सर्वच आपले आहेत. हे कौरव-पांडवांच युद्ध नाही. ही जमिनीची नाही, संस्कृतीची लढाई आहे असे संजय राऊत बेळगावसंबंधी महाराष्ट्र-कर्नाटकातील संघर्षावर म्हणाले.

कर्नाटकातील अनेक कलावंत, साहित्यिक यांच महाराष्ट्रातील साहित्यामध्ये योगदान आहे. गरीश कर्नाड, भीमसेन जोशी पंडित, रजनीकांत यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

भाषेचा आणि संस्कृतीचा झगडा आहे
भाषांमध्ये वाद असू नये, कारण आपला देश एक आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी कन्नडिगांना टोला लगावला. यावेळी सीमाप्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, याठिकाणी दोन्ही बाजूने पांडव आहेत, केवळ थोडा भाषेचा आणि संस्कृतीचा झगडा आहे.

व्याखानमालेसाठी जमताय ही आनंदाची बाब आहे. नाथ पै काय बोलतात हे ऐकायला नेहरूजीही थांबायचे. बेळगावशी बॅ. नाथ पै यांचं जिव्हाळ्याचं नात होतं. बेळगावमध्ये मराठी भाषेची मशाल पेटलेली आहे. बेळगावमध्येच नाही तर महाराष्ट्रातही मराठीसाठी लढावं लागतेय, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

भाषे भाषेमध्ये वाद असायला नको, कारण देश एक आहे. मुंबई, सोलापूरसह इतर महाराष्ट्रतील जिल्ह्यातील कानडी भाषेंच्या शाळांना अनुदान देण्याचं काम आम्ही करतोय. ज्या महानगर पालिकेवर शिवसेनेचा झेंडा आहे, तेथील कन्नड शाळा टिकावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येथील शाळांना अनुदान किंवा हवी ती मदत केली जातेय. शिवसेनेची सत्ता असलेल्या ठिकाणी कन्नड शाळांना अनुदान दिलं आहे. कन्नड साहित्यकांचं मराठी भाषेमध्ये मोठं योगदान आहे.