26 November 2020

News Flash

“….बाबरी खटला त्याच दिवशी संपला,” निकालाआधी संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य

"न्यायालयाला आणि खटल्याला काही महत्व राहिलं नाही"

संग्रहित छायाचित्र (PTI)

१९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालय आज निकाल देणार असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी राम मंदिराची जमीन राम मंदिर ट्रस्टला देण्यात आली, ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिपूजन केलं तेव्हाच बाबरीसाठी विशेष न्यायालयाचं महत्त्व संपलं असल्याचं म्हटलं आहे. बाबरी प्रकरणी भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आरोपी आहेत. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस के यादव यांनी १६ सप्टेंबरला सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. आरोपींमध्ये उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा यांचाही समावेश आहे.

बाबरी प्रकरणावर बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, “राम मंदिराची जमीन राम मंदिर ट्रस्टला देण्यात आली, ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिपूजन केलं तेव्हाच बाबरीसाठी विशेष न्यायालयाचं महत्त्व संपलं. जर कायदेशीर भूमिपूजन झालं आहे तर बाबरी केसच संपते. त्या न्यायालयाला आणि खटल्याला काही महत्व राहिलं नाही”.

आणखी वाचा- Hathras Gangrape: “…तेव्हा रस्त्यावर उतरला होतात,” संजय राऊतांनी केंद्रातील नेत्यांना करुन दिली आठवण

संजय राऊत यांनी यावेळी हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरही भाष्य केलं. “निर्भया प्रकरणानंतर नवीन कायदा करावा लागला होता. आज जे केंद्रात मंत्री आहेत ते आमचे साथीदार होते. आजही आहेत. निर्भयाला न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरले होते. पण आता मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथे जेव्हा अशा प्रकारच्या बलात्कार आणि हत्येच्या घटना होतात तेव्हा सगळे शांत बसतात. अशा घटनांशी सरकारचा कोणताही संबंध नसतो. पण जी पोलीस यंत्रणा, राजकीय व्यवस्था असते त्यांनी तपास करुन गुन्हेगांना फासावर पोहोचवण्याचं काम करायचं असतं,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“अशा घटना का घडतात यासंबधी वारंवार चर्चा झाली आहे. सध्या देशात अशा घटना वाढत आहेत. कायद्याची भीती संपत आहे असं वाटू लागलं आहे. निर्भयावेळी जी भूमिका घेतली आज तीच भूमिका केंद्रातील महिला नेत्यांनी घेणं गरजेचं आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2020 11:05 am

Web Title: shivsena mp sanjay raut on babari masjid demolition case sgy 87
Next Stories
1 महाराष्ट्र : मद्यविक्रीद्वारे मिळणाऱ्या महसूलात २ हजार ५०० कोटींची घट
2 Hathras Gangrape: “…तेव्हा रस्त्यावर उतरला होतात,” संजय राऊतांनी केंद्रातील नेत्यांना करुन दिली आठवण
3 “महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला व तो चांगला नव्हता; त्यामुळे…”
Just Now!
X