मॅजिक फिगर या शब्दाने देशाचा, समाजाचा घात केला आहे. सध्याची लोकशाही ही डोकी मोजण्याची लोकशाही आहे. निवडून येणाऱ्याला तिकीट देणं ही सत्ताधारी आणि विरोधकांची मजबुरी बनली आहे. गुणवत्तेला आता महत्व उरलेलं नाही. निवडून कोण येणार? या गोष्टीला महत्व प्राप्त झालं आहे. आजची लोकशाही डोक मोजणारी बनली आहे असे संजय राऊत म्हणाले.

राज्यकर्ते आपल्या संपादकासाठी लॉबिंग करतात
सत्ताधारी-विरोधकांप्रमाणे पत्रकारही गटानुसार विभागले गेले आहेत. राज्याचा विचार करुन काम करणारे किती पत्रकार आहेत? राज्यकर्ते आपला संपादक वृत्तपत्र किंवा चॅनलमध्ये कसा बसेल? यासाठी लॉबिंग करतात. परिवर्तनाची ताकद वृत्तपत्रामध्ये आहे. आणीबाणीनंतर वृत्तपत्रांनीच पत्रकारांनी परिवर्तन घडवून आणले याची आठवण संजय राऊत यांनी करुन दिली.

निंदकाचे घर शेजारी नकोय
संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षाचा आवाज बुलंद केला पाहिजे. पण आजच्या सत्ताधाऱ्यांची समोर विरोधी पक्षच नको अशी भूमिका आहे. निंदकाचे घर शेजारी असले पाहिजे पण आजच्या सत्ताधाऱ्यांना टीकाकार नकोय असे राऊत म्हणाले.