18 January 2021

News Flash

आपली जनता मुकी बहिरी नाही – उद्धव ठाकरे

शिवसेना कायमच जनतेच्या पाठिशी राहिली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

शिवसेनेने कायमच जनतेची साथ दिली आहे. शिवसेना सत्तेत असली तरी कायम जनतेसोबतच राहिली आहे. आपण कोणाच्याही टीकेची परवा करत नसून आपले मत प्रामाणिक आहे. आपली जनता मुकी बहिरी नाही, ती सहनशील आहे, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शिवसेनेचे आमदार, जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते.

मार्गदर्शनादरम्यान त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या मुद्दयातही हात घातला. जनावरांना माता मानण्याची आपली संस्कृती आहे. त्यांना आपण आपल्या घरातील सदस्य मानतो. तसेच त्यांची पूजाही करतो. अशी संस्कृती जगात कोणत्याही ठिकाणी नाही. सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. अशावेळी अनेक ठिकाणी चारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत. या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोटापाण्याची सोयही शिवसेनेने केली असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

आजवर शिवसेना कायमच जनतेच्या पाठिशी राहिली आहे. सत्तेत असतानाही जनतेचे मुद्दे शिवसेनेने उचलून धरले. आपण कोणत्याही प्रकारच्या टीकेची परवा करित नाही. आपले मन प्रामाणिक आहे. जनतेला आपला हाच प्रामाणिकपणा भावला आहे. त्यामुळेच निवडणुकीत जनतेने आपल्याला भरभरून मतदान केल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आपण अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडले आहेत. तसेच त्यावर कार्यवाहीदेखील सुरू करण्यात आली आहे. निवडणुकीत मी काय बोललो हे लोकांनी ऐकले आहे. आता शेतकरी काय म्हणतो हे आपल्याला ऐकायचे आहे. सर्व जिल्ह्यातील शिवसैनिक हे कायमच शेतकऱ्यांसोबत आहेत. तसेच नुसत्या घोषणा म्हणजे वचनपूर्ती नाही. जी घोषणा झालेली आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही त्यांनी उपस्थितांना यावेळी ठणकावून सांगितले.

निवडणुका येतील आणि जातीलही. केवळ निवडणुका आहेत म्हणून कोणते मुद्दे घ्यायचे असे होणार नाही. जनतेला शिवसेना न्याय देईल. ज्या घोषणा केल्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी सर्व शिवसैनिकांची साथ मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच घरोघरी जाऊन प्रत्येक शिवसैनिकाने जनतेचे अडलेले प्रश्न विचारून ते सोडवण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 7:27 pm

Web Title: shivsena party chief uddhav thackeray guidance mla district chief mumbai jud 87
Next Stories
1 मुंबईतील बैठकीत लोकायुक्त मसुद्याला अंतिम स्वरुप : अण्णा हजारे
2 भारतीय संघाच्या भगव्या जर्सीमागे नरेंद्र मोदींचा हात, अबू आझमींचा आरोप
3 शिवाजी महाराजांच्या पावलावर जगणारा समाज तयार करायचा आहे – संभाजी भिडे गुरुजी
Just Now!
X