28 September 2020

News Flash

Video : ‘रोखठोक’ संजय राऊतांचा हा ‘कोमल’ अंदाजही तुम्हाला आवडेल

मुलीने सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडीओ

शिवसेनेचे राज्यसभा खासदार आणि सामना वृत्तपत्रात आपल्या अग्रलेखांमधून विरोधकांवर आसून ओढणारे संजय राऊत आता संपूर्ण देशाला परिचित झालेले आहेत. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना सरकार असतानाही संजय राऊत आपल्या लेखणीतून तत्कालीन फडणवीस सरकारवर सतत टिकेचे आसूड ओढायचे. यानंतर राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या ३ पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी सरकार स्थापन केलं. यामध्येही संजय राऊतांनी मोठी भूमिका बजावली होती. मध्यंतरी संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टीही झाली होती.

मात्र आज त्यांचं एक अनोखं रुप लोकांना पहायला मिळालं आहे. संजय राऊत यांची मुलगी पुर्वशी राऊतने आपल्या फेसबूक अकाऊंटवर राऊत यांचा पेटी वाजवताना एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपल्या वडिलांची राजकारणा पलिकडची बाजू पुर्वशीने उलगडवून दाखवली आहे.

दरम्यान, करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. सर्वजण मिळून करोनावर मात करूयात. संकट गंभीर आहे. पण हे सरकारही खंबीर आहे. असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिला आहे. टेहळणी किंवा फेरफटका मारायला घराबाहेर पडू नका, कृपया घरात राहा, सुरक्षित राहा असं आवाहन यावेळी राज्यातील जनतेला केलं. बुधवारी व्हिडिओद्वारे संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा लोकांना सहकार्य करावं असं आवाहन केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2020 7:53 pm

Web Title: shivsena rajya sabha mp sanjay raut plays harmonium his daughter share video on facebook psd 91
Next Stories
1 डोंबिवलीत आढळला करोनाचा पहिला रुग्ण
2 उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० महत्त्वाचे मुद्दे
3 Coronavirus: उद्धव ठाकरेंनी मानले लालबागचा राजाचे आभार, म्हणाले…
Just Now!
X