News Flash

“…पुढील १०० वर्ष महाराष्ट्रात विरोधी पक्षाची सत्ता येणार नाही”; फडणवीस-पवार भेटीवरुन संजय राऊतांचा टोला

"शरद पवारांनी फडणवीसांना नक्कीच सत्तेचा मंत्र दिला असेल"

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भेटीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना मार्गदर्शन केलं असेल असं संजय राऊत म्हणाले आहेत. दरम्यान शरद पवारांनी फडणवीसांना सत्तेचा मंत्र दिला असेल असं सांगताना त्यांनी टोलाही लगावला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शरद पवारांनी सत्तेचा मंत्र दिला असेल का? असं विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनी सांगितलं की, “सत्तेचा मंत्र नक्की दिला असेल. ज्याप्रकारे विरोधी पक्ष राज्यात गोंधळ निर्माण करत आहे, सरकारच्या कामात अडथळे निर्माण करत आहे, हे सर्व असंच सुरु राहिलं तर पुढील १०० वर्ष महाराष्ट्रात विरोधी पक्षाची सत्ता येणार नाही हे नक्कीच शरद पवारांनी सांगितलं असेल”.

शरद पवार – फडणवीस भेटीवर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

“फडणवीस माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते आहेत. शरद पवार राज्यातील आणि देशातील मोठे नेते आहेत. ही एक सदिच्छा भेट होती, यामुळे राजकारण तापणार नाही. करोना संकटात विरोधी पक्षाने कशाप्रकारे भूमिका घेतली पाहिजे, काम केलं पाहिजे. महाविकास आघाडीला कोणत्या प्रकारचं सहकार्य विरोधी पक्षाने करण्याची गरज आहे यासंबंधी शरद पवारांनी फडणवीसांना मार्गदर्शन केलं असेल,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. ऑपरेशन लोटस ना बंगालमध्ये होणार ना महाराष्ट्रात असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट

“राज्याला विरोधी पक्षांची मोठी परंपरा आहे. शरद पवारही विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी त्यांनी उत्तम काम केलं होतं. त्यामुळे फडणवीस त्यांच्याकडे गेले असतील तर त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं असेल,” असंही त्यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, “महाराष्ट्रात आपली परंपरा आहे. इतर राज्यांप्रमाणे राजकारणात आपण शत्रुत्व घेऊन बसत नाही. भेटीगाठी, चर्चा होत असते. त्यामुळे या भेटीकडे फार राजकीय हेतूनं पाहणं चुकीचं आहे,” असंही त्यांनी सांगितलं असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 12:55 pm

Web Title: shivsena sanjay raut bjp devendra fadanvis maharashtra government ncp sharad pawar sgy 87
Next Stories
1 जळगाव : विमा नसलेल्या शेतकऱ्यांना देखील सरकारने मदत करावी – फडणवीस
2 देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या घरी; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
3 आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठीसुद्धा उद्धव ठाकरे मोदींना पत्र लिहतील; चंद्रकांत पाटलांचा टोला
Just Now!
X