News Flash

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या टीकेला संजय राऊतांनी दिलं उत्तर; म्हणाले…

"महाराष्ट्र सरकार आपलं अपयश लपवत नाही"

संग्रहित (PTI)

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात तीन दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा शिल्लक असल्याची माहिती दिली आहे. केंद्राकडून गरज आहे तितक्या वेगाने लसींचा पुरवठा होत नसल्याची तक्रारही त्यांनी केली आहे. यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधत करोना आटोक्यात आणण्यात आलेल्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी काही राज्ये लशीचा तुटवडा असल्याची नाहक भीती निर्माण करत असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

“महाराष्ट्र सरकार आपलं अपयश लपवत नाही. या बाबतीत राजेश टोपेच जास्त सांगू शकतील. पण महाराष्ट्राला कमी लेखण्याचा, संकटात आणण्याचा, बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आम्हाला हर्षवर्धन यांच्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती. महाराष्ट्र सरकार काय करत आहे याची दखल जागतिक आरोग्य संघटनादेखील घेत आहे. गुजरात हायकोर्टानेही दखल घेतली आहे. महाराष्ट्र एक मोठं राज्या असून सर्वात जास्त दबाव आहे. आर्थिक, लस, वाढती रुग्णसंख्या अशा अनेक गोष्टींचा दबाव आहे. केंद्र आणि राज्याने एकमेकांवर टीका-टिप्पणी न करता जनतेची सेवा केली पाहिजे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

सचिन वाझेंच्या पत्रावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

लशींचा तुटवडा असल्यासंदर्भात महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींकडून केली गेलेली विधाने म्हणजे करोना आटोक्यात आणण्यामध्ये राज्य सरकारला आलेल्या अपयशापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. राज्यात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकार अपयश ठरले आहे. त्यात लससाठ्यावरून लोकांमध्ये घबराट निर्माण करणे म्हणजे समस्येत आणखी भर घालण्यासारखे आहे, अशा शब्दांत हर्षवर्धन यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. कोणत्या राज्याला किती लशींचा पुरवठा होत आहे, याची अद्ययावत माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालय घेत असते. राज्य सरकारच्या लशींच्या गरजेचा सातत्याने आढावा घेतला जात असतो. त्यामुळे लशींचा तुटवडा असल्याचा महाराष्ट्राचा दावा बिनबुडाचा असल्याचेही हर्षवर्धन यांनी निवेदनात म्हटलं आहे.

‘वैयक्तिक वसुली’साठी करोनाबाधित व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणातून बाहेर पडण्याची मुभा दिली जाते. नियम मोडून राज्य सरकार अख्ख्या महाराष्ट्राला संकटाच्या खाईत लोटत आहे. महाराष्ट्र एकामागून एक संकटाचा सामना करत असताना राज्य नेतृत्वाने मात्र डोळे मिटून घेतले आहेत, असा टीकेचा भडिमार हर्षवर्धन यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 11:41 am

Web Title: shivsena sanjay raut corona vaccination health minister harsh wardhan sgy 87
Next Stories
1 नवे निर्बंध : “माझी सर्वांना विनंती आहे की…”; पवारांचं राज्यातील जनतेला आवाहन
2 “महाराष्ट्राला उत्तर प्रदेशपेक्षाही जास्त लसी मिळाल्या आहेत”; फडणवीसांचं ठाकरे सरकारला उत्तर
3 पुण्यात १०९ लसीकरण केंद्र बंद, “आम्हाला कृपया लसींचा पुरवठा करा”; सुप्रिया सुळेंची केंद्राला विनंती
Just Now!
X