राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाकडून सुरु असलेल्या कारवाईवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्यातील तपास यंत्रणा सक्षम असताना केंद्रीय यंत्रणा मागच्या दाराने आणल्या जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसंच केंद्रीय पथकं कोणाच्या तरी दबावाखाली कारवाई करत असतील तर हे संघराज्य व्यवस्थेला हानीकारक आहे असंही ते म्हणाले प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

अनिल देशमुख यांच्या दोन सहायकांना अटक

“हा दबावाचा प्रश्न नाही, तर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. प्रताप सरनाईक यांच्या पत्रात विनाकारण त्रास दिला जात आहे याचा उल्लेख असल्याचं मी वारंवार सांगत आहे. या तक्रारींचा तपास या राज्याचे पोलीस, तपास यंत्रणा निष्पक्षपणे करु शकतात, न्यायालयं आहेत. तरीदेखील मागच्या दाराने केंद्रीय तपास यंत्रणा आणल्या जात असतील तर शरद पवार म्हणतात ते बरोबर आहे की सत्ता गेल्यामुळे निराशा आणि वैफल्यातून अशा चौकशांचा ससेमिरा मागे लावला जात आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहे.

बार मालकांकडून वसूल केलेले तीन कोटी देशमुखांनी संस्थेच्या नावे वळवले- ईडी

संजय राऊत यांनी सामनामध्ये ईडीची तुलना ब्रिटिशांच्या राजवटीशी केली आहे. यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “सत्तापक्षातील काही लोकांवर ठरवून कारवाई केली जाते. गुन्ह्यांचं स्वरुप पाहता राज्यातील तपास यंत्रणा समर्थ आहेत. पण केंद्रीय पथक कोणाच्या तरी दबावाखाली कारवाई करतात हे संघराज्य व्यवस्थेला हानीकारक आहे”.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबऱ अखेरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून विश्वास व्यक्त केला आहे. यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “जर पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला असेल तर त्यांचं स्वागत करतो”. दरम्यान मोदींनी बनावट लसीकरण शिबीरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असून संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांनी जबरदस्त कारवाई केली असून ते सक्षम असल्याचं म्हटलं आहे.

अनिल देशमुख यांच्या दोन सहायकांना अटक

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे, स्वीय सहायक कुंदन शिंदे यांना नऊ तासांच्या सलग चौकशीअंती शुक्रवारी रात्री अटक केली. तर देशमुख यांना समन्स जारी करत चौकशीस बोलावले. मात्र ईडीने तपासावर घेतलेले प्रकरण नेमके कोणते, हे प्रथम सांगावे त्यानंतर चौकशीस हजर राहू, अशी भूमिका देशमुख यांनी घेतली. देशमुख यांच्या वकिलाने शनिवारी ईडी अधिकाऱ्यांची भेट घेत तपास सुरू केलेल्या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची मागणी केली.

मुंबईतील दहा बारमालकांनी गेल्या तीन महिन्यांत देशमुख यांना चार कोटी रुपयांची लाच दिल्याचे जबाबात सांगितले, असा दावा ईडीतील सूत्रांनी के ला. या माहितीची शहानिशा करण्यासाठी किं वा या माहितीस दुजोरा देणारे पुरावे शोधण्यासाठी शुक्र वारी देशमुख, पालांडे, शिंदे यांच्याशी संबंधित नागपूर, मुंबईतील मालमत्तांवर छापे घाालून शोधाशोध केली. नऊ तासांच्या चौकशीत समाधानकारक उत्तरे न देता असहकार्य के ल्याने संशयाच्या बळावर दोघांना अटक के ल्याचे ईडी अधिकाऱ्याने सांगितले.

या कारवाईनंतर देशमुख यांच्याकडे चौकशी करणे क्र मप्रात ठरले. त्यासाठी त्यांना समन्स जारी करून शनिवारी सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत समन्स बजावण्यात आले, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट के ले. मात्र देशमुख यांच्याऐवजी त्यांच्या वकिलाने प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे मागणारे पत्र सादर के ले.