News Flash

“चोरीचा माल विकत घेणं सुद्धा गुन्हा,” अजित पवारांनी पत्र चोरल्याच्या आरोपाला संजय राऊतांनी दिलं उत्तर

अजित पवारांनी शरद पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरल्याच्या चंद्रकांत पाटलांच्या आरोपाला संजय राऊतांचं उत्तर

अजित पवारांनी शरद पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरल्याच्या चंद्रकांत पाटलांच्या आरोपाला संजय राऊतांचं उत्तर

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत अजित पवारांनी शरद पवारांच्या ड्रॉवरमधून ५४ आमदारांची स्वाक्षरी असलेलं पत्र चोरल्याचा आरोप केला आहे. शरद पवारांच्या ड्रॉवरमधून चोरून ५४ आमदारांची यादी राज्यपालांना सादर करणे कोणत्या नैतिकतेत बसते, तरीही ते शहाणपणा शिकवतात अशी टीका त्यांनी केली होता. दरम्यान त्यांच्या या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“अजितदादा पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरत असताना खोलीत भाजपाचे कोण लोक होते?”

सामना संपादकीयमधून चंद्रकांत पाटील यांच्या टीकेचा समाचार घेण्यात आला असून जोरदार हल्ला करण्यात आला आहे. यासंबंधी विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनी सांगितलं की, “ते पत्र चोरण्यास कारण काय? पत्र चोरल्याचा आरोप भाजपाने केला आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा जुनी जळमटं काढून फेकून द्यायला हवी होती. पण भाजपाचे सहकारी त्यातून बाहेर पडलेले नाहीत. त्यांच्या मनाला हा विषय फार लागला आहे”.

 “शरद पवारांच्या ड्रॉवरमधून चोरून ५४ आमदारांची यादी…”, चंद्रकांत पाटलांचं अजितदादांना प्रत्युत्तर

“चोरीचा माल विकत घेणं हा सुद्धा गुन्हा आहे. एखाद्या नेत्याने शरद पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरलं असेल तर त्याच्या आधारे सरकार स्थापन करणं आणि चोरीचा माल विकत घेणं हा फार मोठा गुन्हा आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

भाजपा नेत्यांनी शिवसेनेने विश्वासघात केल्याची टीका केली असून यावर बोलताना ते म्हणाले की, “आम्हालाही विश्वासघात केल्यानंतर वाईट वाटतंच. उद्धव ठाकरेंना भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी शिवसेना प्रमुखांच्या खोलीत मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला होता असं उद्धव ठाकरे म्हणतात. तो शब्द पाळला गेला नाही हा विश्वासघात असून अनैतिक आहे. ती वेदना आजही टोचत आहे. पण आम्ही विसरुन गेलो आहे. त्यामुळे भाजपानेसुद्धा पत्र, शिवसेनेने फसलं यातून बाहेर पडलं पाहिजे आणि एक विरोधी पक्ष म्हणून खंबीर नेतृत्व उभं करुन काम केलं पाहिजे”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 11:20 am

Web Title: shivsena sanjay raut on bjp chandrakant patil letter ncp sharad pawar sgy 87
Next Stories
1 शरद पवार-उद्धव ठाकरे भेटीत काय चर्चा झाली?; संजय राऊतांनी दिली माहिती
2 “अजितदादा पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरत असताना खोलीत भाजपाचे कोण लोक होते?”
3 कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात तीन भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू
Just Now!
X