News Flash

शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर विधानपरिषदेवर? संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

सदस्यांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्याचा प्रस्ताव मंजूर

राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या १२ सदस्यांच्या नियुक्तीसाठी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या नावाची चर्चा सध्या रंगली आहे. उर्मिला मातोंडकरला शिवसेनेकडून विधानपरिषेदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान सदस्यांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्याचा प्रस्ताव बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

संजय राऊत यांना उर्मिला मातोंडकरला पक्षाकडून उमेदवारी देण्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “यासंदर्भात मीदेखील चर्चा ऐकत आहे. हा निर्णय मंत्रीमंडळाचा असतो. मंत्रीमंडळात निर्णय घेतले जातात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यासंदर्भात मंत्रीमंडळाने अधिकार दिले आहेत”.

संजय राऊत यांनी यावेळी बिहारमधील मुंगेर हिंसाचारावर भाष्य केलं. हा हिंदुत्वावर हल्ला असल्याचं ते म्हणाले आहेत. “पण आतापर्यंत ना राज्यपालांनी, ना तेथील भाजपाने यासंबंधी प्रश्न उपस्थित केले आहेत. मी तर महाराष्ट्राच्या राज्यपालांना तेथील राज्यपालांशी चर्चा करा अशी विनंती करणार आहे. तेथील सरकारचे प्रमुख धर्मनिरपेक्ष झाले का असं विचारा? असं सांगणार आहे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या १२ सदस्यांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्याचा प्रस्ताव बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. मात्र राज्यपालांना पाठविण्यात येणाऱ्या यादीत नेमकी नावे कोणाची आहेत, याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.

विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ जागा एप्रिल ते जून या दरम्यान मुदत संपल्याने रिक्त झाल्या होत्या. राज्य सरकारकडून त्या जागांवर नियुक्त्यांसाठी काही नावे पाठविण्यात आली होती; परंतु संविधानातील तरतुदीकडे बोट दाखवत राज्यपालांनी विधान परिषदेवर राजकीय नियुक्त्या करण्यास नकार दिला.

आणखी वाचा- संजय राऊत करणार राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना विनंती, म्हणाले…

राज्यपाल नामनिर्देशित सदस्य हे साहित्य, कला, विज्ञान, सहकार, सामाजिक कार्य या क्षेत्रांतील विशेष ज्ञान व अनुभव संपन्न असावेत अशी संविधानात तरतूद आहे. त्याचा आधार घेत, राज्यपालांनी राज्य सरकारला नव्याने नावांची शिफारस करण्याचे कळविले. राज्यपालांची सूचना सरकारला मान्य करावी लागली.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये विधान परिषदेच्या १२ जागांचे समान वाटप करण्यात आले. तीनही पक्षांत विशेषत: काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधान परिषदेवर वर्णी लागण्यासाठी इच्छुकांची गर्दी होती. त्यातून दोन्ही पक्षांनी प्रत्येकी चार नावे निश्चित केल्याचे समजते. शिवसेनेचीही चार नावे निश्चित झाल्याचे कळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 10:20 am

Web Title: shivsena sanjay raut on bollywood actress urmila matondkar vidhan parishad nomination sgy 87
Next Stories
1 “उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा देणं ही वादळापूर्वीची शांतता असू शकते”
2 “बिहारमध्ये हिंदुत्वावर पोलिसांनी गोळ्या चालवल्यात हो”
3 गांधी विचारांचा प्रतिकृतीमधून प्रसार
Just Now!
X