News Flash

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेवर संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…

"हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असला तरी...,"

संग्रहित

पक्षांतर्गत राजकारणामुळे बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. बाळासाहेब थोरात यांच्या जागी दुसऱ्या मोठ्या नेत्याला प्रदेशाध्यक्षपद दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. बाळासाबेत थोरात यांनी सोमवारी दिल्लीत जाऊन ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेत नाराजी जाहीर केल्याची चर्चा होती. बाळासाहेब थोरात यांनी हे वृत्त फेटाळलं होतं. पण सोबतच जर ती प्रक्रिया सुरु झाली असेल त्याचं स्वागत करतो म्हणत सूचक विधान केलं होतं. दरम्यान या सर्व घडामोडींवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

….तर ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारणार; संजय राऊतांचा जाहीर इशारा

“विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. विदर्भातील नाना पटोले तिथे अध्यक्ष आहेत. प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद बदललं जात असून जी काही नावं आहेत त्यात नाना पटोलेंचं नाव असल्याचं मी प्रसारमाध्यमांमध्ये पाहत आहे. आता हा शेवटी त्यांचा अंतर्गत प्रश्न असला तरी महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या एका प्रमुख पक्षातील या घडामोडी आहेत. त्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण आमच्यातील कोणताही पक्ष अंतर्गतसुद्धा अस्थिर होऊ नये, अस्वस्था राहू नये ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. तरच हे तीन पक्षांचं सरकार हे प्रदीर्घ काळ चालणार आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यासंबंधीचा निर्णय काँग्रेसमचे दिल्लीमधील नेते घेतील असंही त्यांनी सांगितलं आहे.

राजीनाम्याच्या चर्चेवर बाळासाहेब थोरातांनी सोडलं मौन, म्हणाले…

बाळासाहेब थोरात यांची भूमिका काय?
“मी दिल्लीत गेलो त्याचा आणि राजीनाम्याचा काही संबंध नाही. माझे दर महिन्याला काही विषय असतात त्यांची चर्चा करण्यासाठी गेलो होतो. मलाही दिल्लीतच ही बातमी समजली,” असं ते म्हणाले. “माझ्याकडे प्रदेशाध्यक्ष, विधीमंडळ नेता आणि महसूल मंत्री या जबाबदाऱ्या असून दिल्लीत जाऊन योग्य प्रकारे त्या सांभाळेन असं सांगितलं होतं. पण तुम्हाला अजून काही जबाबदारी द्यायची असेल तर माझी हरकत नाही असंही सांगितलं होतं. ऑक्टोबर महिन्यातदेखील मी कोणत्या जबाबदारीचं विभाजन करायचं असेल तर हरकत नाही असं स्पष्ट केलं होतं. एच के पाटील काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी झाल्यानंतर त्यांनासुद्धा ही वस्तुस्थिती सांगितली होती. पण अचानक हा मुद्दा का आला याची मला कल्पना नाही. पण जर ती प्रक्रिया सुरु झाली असेल त्याचं स्वागत करतो,” असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

दिल्लीतील नेत्यांसोबत राजीनाम्याची चर्चा झाली का ? या प्रश्नावर ते म्हणाले की, “दिल्लीत जाऊन मी राजीनाम्याची चर्चा करण्याची काहीच गरज नव्हती. एकाच व्यक्तीकडे इतक्या जबाबदाऱ्या आहेत, त्यामध्ये इतरांना जबाबदारी वाटून द्यावी अशी भूमिका कोणी मांडत असेल तर त्यात काही चुकीचं नाही. त्यातच यासंबंधी प्रक्रिया सुरु झाली असेल तर मी स्वागत करतो. मी समाधानी, आंनंदी आहे. मला काही अडचण नाही”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 11:26 am

Web Title: shivsena sanjay raut on congress state president balasaheb thorat nana patole sgy 87
Next Stories
1 ….तर ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारणार; संजय राऊतांचा जाहीर इशारा
2 बर्ड फ्ल्यू – अंडी, चिकन खाणाऱ्यांना पशूसंवर्धनमंत्र्यांचा महत्त्वाचा सल्ला
3 नितेश राणेंना फडणवीस तुरूंगात टाकणार होते, पण…; शिवसेना खासदार राऊत यांचा गौप्यस्फोट
Just Now!
X