News Flash

संजय राऊतांनी किरीट सोमय्यांना दिली जाहीर ‘वॉर्निंग’; म्हणाले…

"हातात कागद घेऊन गिधाडासारखा फडफडतोय"

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तिखट शब्दांत त्यांच्यावर टीका केली आहे. “खुलासा कोणी आणि कशासाठी करावा हे शेठजींच्या पक्षाचे व्यापारी असणारे प्रवक्ते सांगणार नाहीत. आमच्या मराठी भगिनीचं कुंकू पुसलं गेलं आहे. त्या स्वत: आणि त्यांची कन्या गेले अनेक महिने न्यायासाठी आक्रोश करत आहेत. त्याच्यावरती शेठजींच्या पक्षाचे हे व्यापारी प्रवक्ते बोलायला तयार नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“आम्ही जेव्हा त्या अबलेला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत तेव्हा तपास भरकटवण्यासाठी, तपासाची दिशा बदलण्यासाठी हे शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते असे फालतू मुद्दे घेऊन समोर येत आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. म्हणजे त्या बाईचं कुंकू पुसलं तरी चालेल. आणि कोणत्या जमिनीचे व्यवहार… कोण आहे हा माणूस? याला काय माहिती आहे. २०१४ सालचा एक कायदेशीर व्यवहार आहे. त्याच्यासाठी हातात कागद घेऊन गिधाडासारखा फडफडतोय,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

ठाकरे कुटुंबासोबत केलेल्या जमीन व्यवहारावर अन्वय नाईक कुटुंबीयांनी केला खुलासा; म्हणाले…

“मराठी माणसाने केलेला व्यवहार यांच्या डोळ्यात खुपतोय का? म्हणे २१ व्यवहार केले. हा खोटारडेपणाचा कळस आहे. ही त्यांना वॉर्निंग आहे. त्यांनी अशी कितीही फडफड केली तरी महाराष्ट्राचं सरकार पाच वर्ष चालणार. आमची भूमिका अन्वय नाईक यांच्या पत्नीला न्याय द्यायची आहे. गुन्हेगारांना शिक्षा देण्याची आहे. शेठजीच्या पक्षाच्या प्रवक्त्यांना गुन्हेगारांना वाचवायचं आहे म्हणून अशी फडफड करत आहेत. त्यांनी कितीही फडफड केली तरी काही निष्पन्न होणार नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“बाळासाहेब असताना जे मातोश्रीवर होत नव्हतं ते सुरु आहे,” नारायण राणेंचा गंभीर आरोप
“रश्मी ठाकरे कधीही गाणं म्हणणे, चेहरा बदलणे, वेगवेगळी विधानं करणे यात पडल्या नाहीत,” शिवसेनेचं उत्तर

“कायद्याच्या चौकटीत राहून केलेला व्यवहार हे लोक भ्रष्टाचार म्हणून ओरडत आहेत. ते रोज सकाळी उठल्यावर आरशात स्वत:चा चेहरा पाहतात आणि ची प्रतिमा पाहून भ्रष्टाचार झाला असं वाटतं. आरशातही भ्रष्टाचार झाला आहे असं म्हणतील,” अशी उपहासात्मक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

“उद्धव ठाकरे-अन्वय नाईक कुटुंबीयांमध्ये जमिनीचे २१ व्यवहार”
“…बोबडी वळली होती का?,” किरीट सोमय्यांच्या आरोपांना अन्वय नाईकांच्या कुटुंबीयांनी दिलं उत्तर

“ही निराशा, वैफल्य आहे. एका गुन्हेगाराला भेटण्यासाठी तुम्ही तुरुंगात जाता, आंकांडतांडव करत आहात. कोण लागतो तो तुमचा? ती महिला तुमची कोणी लागत नाही? तिचा नवरा मेला आहे, सासू मेली आहे. ते तुमचे कोणीही लागत नाहीत. हे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. हे ढोंगी, भंपक, खोटारडे, बनावट लोक आहेत,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2020 10:37 am

Web Title: shivsena sanjay raut warning to bjp leader kirit somaiya anvay naik suicide case sgy 87
Next Stories
1 ठाकरे कुटुंबावरील आरोपानंतर संजय राऊत संतापले; भाजपाला आव्हान देत म्हणाले…
2 ठाकरे कुटुंबासोबत केलेल्या जमीन व्यवहारावर अन्वय नाईक कुटुंबीयांनी केला खुलासा; म्हणाले…
3 ‘ड्रॅगन फ्रुट’च्या लागवड क्षेत्रात वाढ
Just Now!
X