कधीकाळी ज्या पक्षाच्या विरोधात निवडणूक लढली तोच शिवसेना पक्ष नंबर वन राहिला पाहिजे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. ते मुंबईतील कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करत होते. मुंबईच्या निवडणुकीचे रणशिंगही त्यांनी यावेळी फुंकले आणि गयारामांना चांगलेच चिमटे घेतले. या संपूर्ण भाषणाचा हा व्हिडिओ.

बुलेट ट्रेन कशाला माथी मारताय? अजित पवारांचा सवाल
महाराष्ट्राची इच्छा नसताना सव्वा लाख कोटी रुपयांची बुलेट ट्रेन, महाराष्ट्राला त्याचा काय फायदा आहे? आपण याबाबत पुर्नविचार करतो आहोत. बुलेट ट्रेनचं काम पुढं गेलं तर हा खर्च दीड लाख कोटींपर्यंत होईल, असं सांगितलं जात आहे. हा खर्च महाराष्ट्राच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर केला.