News Flash

“अमित शाह यांना बोलावून शिवसेना संपविण्याची सुपारी दिली”

अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर शिवसेना-भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. नारायण राणे यांच्या लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्धाटनासाठी अमित शाह आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले. अमित शाह यांच्या आरोपांनंतर एका शिवसैनिकाचं पत्र व्हायरल झालं आहे.

शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन नव्हतेच!

पत्रामध्ये नारायण राणे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. गृहमंत्रीपदी असणाऱ्या अमित शाह यांनी नारायण राणेंच्या कार्यक्रमात शिवसेना संपविण्याचा केलेला उल्लेख केलेला ऐकून नारायण राणेंना सुद्धा हसू आवरलं नसेल. नारायण राणेंनी गेल्या १५ वर्षांपासून शिवसेना संपविण्याचा विडा उचलला होता. पण त्यांना जमलं नाही. म्हणून त्यांनी अमित शाह यांना बोलावून शिवसेना संपविण्याची सुपारी दिली, असं पत्रात म्हटलं आहे.

“…ही तडफड असते,” वचन न दिल्याच्या अमित शाह यांच्या दाव्यावर संजय राऊतांचं उत्तर

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही पत्रातून निशाणा साधला आहे. “गुजराती माणूस महाराष्ट्रात येऊन, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जन्माला आलेल्या शिवसेनेला संपविण्याचे वाक्य बोलतो आणि नारायण राणेसकट कार्यक्रमाला उपस्थित संपूर्ण मराठी जण या वाक्याला टाळ्या वाजवण्यासारखं मराठी माणसाच दुसरं दुर्दैव नसेल,” अशी खंत व्यक्त केली आहे.

अमित शाह काय म्हणाले-
“महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतंही आश्वासन दिलं नव्हतं,” असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं. “भाजप-शिवसेना युतीला जनादेश दिला असताना शिवसेनेने तो नाकारत तीन चाकी सरकार निर्माण केले. मी बंद खोलीत नाही, तर जाहीररीत्या शब्द देतो,” असं सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेला फटकारलं. “शिवसेनेच्या मार्गाने आम्ही चाललो असतो तर शिवसेनाच शिल्लक राहिली नसती,” असंही ते म्हणाले.

“जनादेशाचा अनादर करत सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेने तीन चाकी सरकार निर्माण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर उद्धव ठाकरे यांनी मतं मागितली आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शिवसेनेला त्यांनी तिलांजली दिली आहे. या तीन चाकी सरकारची तीन दिशांना तोंडं आहेत,” अशी टीका त्यांनी केली.

शिवसेनेवर टीका करताना शाह म्हणाले, “आम्ही तुमच्या रस्त्यावर चालणार नाही, तुमच्या मार्गाने चाललो असतो तर सेना उरलीच नसती. आम्ही जनकल्याण, अंत्योदय, राष्ट्रभक्ती या मार्गाने चालणारे आहोत. महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकत्र्यांना सरकारने घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी कार्यकर्ते घाबरणार नाहीत”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 8:25 pm

Web Title: shivsena uddhav thackeray letter to shivsainik after amit shah sindhudurg visit sgy 87
Next Stories
1 ऊर्जा विभागाच्या भरती प्रक्रियेतील एसईबीसी विद्यार्थ्यांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा
2 एफआरपीची मोडतोड करणाऱ्या कारखान्यांची साखर जप्त करा – राजू शेट्टी
3 सातारा बसस्थानकात एकामागोमाग एक शिवशाही बस पेटत गेल्या; शहरात एकच खळबळ
Just Now!
X