25 October 2020

News Flash

पोटनिवडणुकीच्या वादातून अहमदनगरमध्ये गोळीबार, दोन शिवसैनिकांची हत्या

पोटनिवडणुकीच्या वादातून अहमदनगरमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारात शिवसेनेच्या संजय कोतकर आणि वसंत ठुबे या दोघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

संग्रहित छायाचित्र

पोटनिवडणुकीच्या वादातून अहमदनगरमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारात शिवसेनेच्या संजय कोतकर आणि वसंत ठुबे या दोघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अहमदनगरच्या केडगाव भागातील सुवर्ण नगर या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनंतर परिसरात तणाव असून शिवसेनेने उद्या अहमदनगर बंदची हाक दिली आहे. संजय कोतकर हे शिवसेनेचे नगरचे उपशहरप्रमुख होते. तर वसंत ठुबे हे शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते होते. केडगाव पोटनिवडणुकीच्या वादातून या दोघांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.

केडगाव परिसरात तणाव निर्माण झाला आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. या दोघांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करावी या मागणीसाठी शिवसैनिकांनी अहमदनगर-पुणे मार्गावर रास्ता रोकोही केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसंत ठुबे आणि संजय कोतकर हे दोघेही सुवर्णनगर भागात आले होते. त्याचवेळी दोघांनी आपल्याजवळच्या बंदुकीतून या दोघांवर गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोर फरार झाले. या घटनेची माहिती समजल्यावर आणि गोळ्यांचे आवाज ऐकल्यावर गोळीबार झालेल्या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणावर जमले. संतप्त जमावाने आपल्या भावनांचा उद्रेक करत दगडफेक करण्यास सुरुवात केली. ज्यानंतर परिसरातील दुकानदारांनी दुकाने बंद केली तर कोणीही घराबाहेर पडले नाही. या प्रकरणी पोलीस आता हल्लेखोरांचा शोध घेत आहेत अशीही माहिती समोर आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 9:05 pm

Web Title: shivsena upshahar pramukh sanjay kotkar and shivsaink vasant thube murdered at kedgav nagar
Next Stories
1 नाशिक मनपा पोटनिवडणुकीत मनसेची बाजी!
2 पुण्यात लॉक अपमध्ये असलेल्या दोन कैद्यांचा आत्महत्येचा प्रयत्न
3 अब्रू वाचवण्यासाठी घराच्या गॅलरीतून मारली उडी, मुंबईनंतर पुण्यातील धक्कादायक घटना
Just Now!
X