News Flash

“रेमडेसिवीर, लसीकरणाबाबत भेदभाव”; ठाकरे सरकारला शिवसेना नेत्याचा घरचा आहेर

"मला राजकारणावर बोलायचं नाही"

संग्रहीत छायाचित्र

राज्यात सध्या लसीचे डोस, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन पुरवठ्यावरुन ठाकरे सरकार आणि केंद्रात आरोप-प्रत्यारोप सुरु असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे राज्य सरकार केंद्राकडे मदत मागत असताना दुसरीकडे राज्यातील भाजपा नेते सरकार अपयशी ठरल्याची टीका करत आहे. राज्यातील भाजपा नेत्यांसोबत केंद्रातील भाजपा नेते पियुष गोयल आणि प्रकाश जावडेकरदेखील राज्य सरकारवर हल्लाबोल करत आहेत. यादरम्यान शिवसेनेच्या नेत्याने सरकारला घरचा आहेर दिला आहे.

शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी लसीकरण, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरबाबत पुरंदरशी भेदभाव केला जात असल्याचा केला आहे. पुण्यातील पुरंदर जिल्ह्यात ऑक्सिजन, रेमडेसिवरचा तुटवडा असून लसीकरणही थांबलं असल्याने विजय शिवतारे यांनी संताप व्यक्त केला आहे. यासंबंधी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेटही घेतली. रेमडेसिवीरच्या तुटवड्यावरुन आपण ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

आणखी वाचा- …हे लहान पोरांसारखं माझं चॉकलेट तू का काढून घेतलंस; आव्हाडांचा भाजपा टोला

यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, “महाविकास आघाडीच्या विरोधात माझी भूमिका नाही. प्रशासनाच्या भूमिकेवर माझी नाराजी आहे. जिल्हाधिकारी, FDA यांच्या कारवाईवर संशय आहे. पुरंदर मध्ये १८०० रुग्ण असताना फक्त २२५ रेमडेसिवीर मिळाले आहेत. लसीकरणबाबतीतही आमच्यावर अन्याय झाला आहे. पुरंदर मध्ये जास्त धोका असतांना फक्त ३४ हजार लसीकरण झालं आहे. इतर जिल्ह्यात मात्र दुपटीने लसीकरण झालं. प्रशासनाकडे २०० बेडसाठी परवानगी मिळावी यासाठी विनंती केली आहे”.

आणखी वाचा- “मुख्यमंत्री कट्टीबट्टीचा डाव खेळत आहेत; रूग्णांच्या मृत्यूंना राज्य सरकारच जबाबदार”

“ऑक्सिजनचा पुरवठा तातडीनं करावा. आमच्याकडे इथेनॉल प्लांट आहे त्यामध्ये जागा आहे, तिथं ऑक्सिजन प्लांटची परवानगी दिली,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. कोविड सेंटरमध्ये निकृष्ठ दर्जाचं जेवण दिलं जात असल्याची तक्रार यावेळी त्यांनी केली. प्रचंड मोठ्या प्रमाणात ब्लॅक मार्केटिंग सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

आणखी वाचा- “साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”

प्रशासन चांगलं काम करत आहे पण आमच्यासोबत दुजाभाव केला असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. सम प्रमाणात सगळ्या गोष्टींचे वाटप करावं अशी मागणी करताना मला राजकारणावर बोलायचं नाही, आमच्या आमदारांवर मी काहीही बोलणार नाही असंही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2021 2:48 pm

Web Title: shivsena vijay shivtare on remdesivir shortage in purandar pune sgy 87
Next Stories
1 …हे लहान पोरांसारखं माझं चॉकलेट तू का काढून घेतलंस; आव्हाडांचा भाजपा टोला
2 “मुख्यमंत्री कट्टीबट्टीचा डाव खेळत आहेत; रूग्णांच्या मृत्यूंना राज्य सरकारच जबाबदार”
3 “रेमडेसीविरचा गेमडीसीविर करू नका,” रामदास आठवले ठाकरे सरकारवर संतापले
Just Now!
X