13 August 2020

News Flash

कल्याणच्या पोटनिवडणुकीत शिवसेना विजयी

शिवसेनेचे कल्याण-डोंबिवलीतील ज्येष्ठ नेते राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने रिक्त झालेल्या कर्णिक रोड प्रभागातून देवळेकर यांचे समर्थक शिवसेनेचे प्रभुनाथ भोईर यांनी २ हजार ५८०

| October 16, 2012 07:07 am

शिवसेनेचे कल्याण-डोंबिवलीतील ज्येष्ठ नेते राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने रिक्त झालेल्या कर्णिक रोड प्रभागातून देवळेकर यांचे समर्थक शिवसेनेचे प्रभुनाथ भोईर यांनी २ हजार ५८० मतांनी विजय मिळवला. आगामी विधिमंडळ निवडणुकीचा विचार करता देवळेकर यांच्यासाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेचा विषय बनली होती. या विजयामुळे त्यांचा स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिकेत जाण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
कर्णिक रोड प्रभागात बाहेरचा उमेदवार असूनही देवळेकर यांनी सर्व ‘प्रतिष्ठा’ पणाला लावून भोईर यांना निवडून आणले. काँग्रेस उमेदवार चैत्राली बोराडे यांना या निवडणुकीत पराभवाचा धक्का दिला. बोराडे यांना ९३२, मनसेच्या रेखा भोईर यांना ५२६ मते मिळाली. उच्च न्यायालयाने देवळेकर यांचे नगरसेवक पद रद्द केल्यापासून त्यांचे राजकीय भवितव्य काय असे प्रश्न निर्माण केले जात होते. शिवसेनेतील एक अभ्यासू, मुत्सद्दी, मितभाषी नगरसेवक म्हणून देवळेकर यांच्याकडे पाहिले जाते. पालिकेच्या सभागृहात परिपक्व असा नगरसेवक आता नसल्याने शिवसेनेची गोची झाली होती. मात्र, भोईर यांना निवडून आणून देवळेकर यांनी आपली ताकदही दाखवून दिली आहे.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2012 7:07 am

Web Title: shivsena won by election pol in kalyan
टॅग By Election
Next Stories
1 गांधारपाले गावाजवळ ट्रेलरला अपघात
2 मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त माजी विद्यार्थ्यांना आवाहन
3 चलन विनिमय कार्यालयातून ३२ लाखांचे चलन लंपास
Just Now!
X