शिवसेनेचे माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या पत्नीचे औरंगाबादमध्ये निधन झाले. सरोज जैस्वाल या गेल्या काही काळापासून दीर्घ आजाराशी झुंज देत होत्या. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर औरंगाबादच्याच खासगी रूग्णालयात उपचार सुरु होते. आता मंगळवारी म्हणजेच २३ जानेवारीला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जैस्वाल यांच्या निवासस्थानावरून अंतयात्रा निघणार आहे. पुष्पनगरी स्मशानभूमीत सरोज जैस्वाल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सरोज यांच्या पश्चात पती प्रदीप जैस्वाल, मुलगा निखिलेश, ऋषिकेश आणि सून असा परिवार आहे.