News Flash

‘शिवशाही’चा प्रवास २३० ते ५०५ रुपयांनी स्वस्त

ज्येष्ठ नागरिकांना शिवशाहीचा प्रवास आणखी स्वस्त होणार

राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर एसटी महामंडळाने शिवशाही शयनयान (एसी, स्लीपर) सेवेचे तिकीट दर २३० ते ५०५ रुपयांनी कमी केले आहेत. नवे तिकीट दर १३ फेब्रुवारीपासून लागू होतील, असे महामंडळाकडून सांगण्यात आले.

राज्यात ४२ मार्गावर शिवशाही (स्लीपर) धावतात. त्या सर्व मार्गावरील तिकीट दर कमी करण्यात आले आहेत. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, खासगी वाहतुकीशी स्पर्धा त्याचप्रमाणे लांब पल्ल्याचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांसाठी सुखकर आणि माफक दरामध्ये व्हावा, या उद्देशाने ही कपात करण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. एसटी महामंडळाने शिवशाही शयनयान बसच्या तिकीट दरातील कपातीचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठविला होता.

खासगी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी दरकपातीचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठवला होता. स्पर्धेसोबत कमीत कमी पैशांत प्रवाशांना सुखकर प्रवास उपलब्ध करून द्यावा, हाही उद्देश दरकपातीमागे होता, असे महामंडळाचे अध्यक्ष रावते यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ नागरिकांना याआधीच ३० टक्के सवलत होती. नव्या दरपत्रिकेनुसार ज्येष्ठ नागरिकांना शिवशाहीचा प्रवास आणखी स्वस्त होणार आहे.

नव्या दरपत्रिकेनुसार प्रवाशांना मुंबई-औरंगाबाद प्रवासासाठी १०८५ ऐवजी ८१० रुपये, मुंबई-लातूरसाठी १२७५ ऐवजी ९५० रुपये, मुंबई-रत्नागिरीसाठी ९५५ ऐवजी ७१५, मुंबई-कोल्हापूरसाठी १०५० ऐवजी ७८५, मुंबई-अक्कलकोटसाठी १२१० ऐवजी ९०५, मुंबई-पंढरपूरसाठी १०२० ऐवजी ७६०, बोरिवली-उदगीरसाठी १४८० ऐवजी ११०५, पुणे-नागपूरसाठी १९९० ऐवजी १४८५ रुपये मोजावे लागतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2019 10:15 am

Web Title: shivshahi sleeper bus fare reduced
Next Stories
1 अजून दोन दिवस थंडीचा कडाका, नाशिकमध्ये गारपिटीची शक्यता
2 महाराष्ट्र सर्वात कमी धूम्रपान करणारे राज्य
3 कडाक्याच्या थंडीने महाबळेश्वर गोठले
Just Now!
X