News Flash

धक्कादायक! शेतीच्या वादातून चुलत्याने केली दोन्ही पुतण्यांची खोऱ्याने ठेचून हत्या

आरोपी चुलता आणि त्याचा मुलगा फरार

प्रतिकात्मक छायाचित्र

शेतजमिनीचे वाद हे किती टोकाचे असतात याचे एक ताजे उदाहरण नुकतेच समोर आले आहे. तुळजापूर तालुक्यात शेतीच्या जुन्या वादातून चुलत्याने आपल्या दोन पुतण्यांची खोऱ्याने ठेचून क्रूरपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.

आरळी बु. येथील सुरेश यादव (वय ५५) याने त्याचे पुतणे रमेश विठोबा यादव (वय ४७) आणि गणेश गोविंद यादव (वय २९) यांच्या डोक्यात शेतीच्या कामात वापरण्यात येणाऱ्या खोऱ्याचा वापर करीत पाठीमागून डोक्यात वार करून क्रूरपणे गंभीर जखमी केले. घटनेनंतर आरोपी सुरेश यादव आणि त्याचा मुलगा संभाजी सुरेश यादव (वय २१) हे दोघेही फरार झाले आहेत. शेतीच्या वादातून हे हत्याकांड घडले आहे. सततच्या शेतीवादाचा परिणाम हा दोन व्यक्तीच्या हत्या करण्यापर्यंत झाला.

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक राऊत, ईटकळ दूरक्षेत्राचे सातपुते यांच्यासह गावचे पोलीस पाटील युवराज पाटील, उपसरपंच व्यंकट पाटील, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष किरण व्हरकट, सुनील पारवे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या हत्याकांडामुळे आरळी व परिसर हादरून गेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 9:49 pm

Web Title: shocking both nephew were crushed to death by their uncle in an agricultural dispute at usmanabad aau 85
Next Stories
1 साताऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षी सुरु होणार; अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास
2 सुखद बातमी, राज्यात आत्तापर्यंत १ लाखांपेक्षा जास्त करोना रुग्ण बरे होऊन घरी
3 अकोल्यात आणखी तीन रुग्णांचा बळी, आत्तापर्यंत ८३ जणांचा मृत्यू
Just Now!
X