07 July 2020

News Flash

धक्कादायक: मद्यपी मुलाची डोक्यात वरवंटा टाकून आईनेच केली हत्या

शहापूर पोलिसांनी मृत मुलाच्या आईला घेतले आहे ताब्यात

प्रतिकात्मक फोटो

सतत मद्यप्राशन करून त्रास देणाऱ्या मुलाला त्याच्या आईने संतपाच्याभरात वरवंटा फेकून मारल्याने मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. इचलकरंजी जवळील कोरोची या गावात ही घटना घडला आहे. रविशंकर तेलसिंगे (वय 34 ) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून मृत मुलाची आई लक्ष्मी तेलसिंगे यांना ताब्यात घेतले आहे. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

इचलकरंजी जवळ असलेले कोरोची येथील तीन विहिरीजवळ ही घटना काल रात्री उशिरा घडली. आईने स्वतःच्याच मुलाची हत्या केल्याच्या घटनने संपूर्ण परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

आणखी वाचा- बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या बापाची १९ वर्षीय मुलीकडून हत्या

किरकोळ काम करणारा रविशंकर हा नेहमी दारू पिऊन घरच्यांना त्रास देत असे. शिवीगाळ मारहाण करणे असे प्रकारही करत असे. या सततच्या वागण्याल्या कंटाळलेल्या त्याच्या आईने अखेर संतापाच्याभरात हे टोकाचे पाऊल उचलले, असल्याची माहिती समोर आली आहे.
काल रात्री दहा वाजेच्या सुमारास आई व मुलात जोरदार भांडणं झाली होती. दरम्यान, आईने रागाच्या भरात वरवंटा मुलाच्या दिशेने फेकला. त्याच्या डोक्याला वर्मी घाव बसला. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या रविशंकरला तातडीने इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने त्याला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठवले होते. अखेर उपचार सुरू असताना रविशंकरचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुलाच्या आईस शहापूर पोलिसानी ताब्यात घेतले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 10:33 am

Web Title: shocking murder of an alcoholic boy by his mother in ichalkaranji msr 87
Next Stories
1 महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत झाली वाढ
2 बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या बापाची १९ वर्षीय मुलीकडून हत्या
3 चक्रीवादळाचे संकट; प्रशासन सज्ज; बुधवारी औद्योगिक व व्यापारी आस्थापने बंद
Just Now!
X