News Flash

धक्कादायक! नालासोपाऱ्यात महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेहावर बलात्कार

येथील टेम्पोत सापडलेल्या मृतदेहाचा पोलिसांनी लावला छडा

नालासोपाऱ्यामधील टेम्पोत सापडलेल्या एका महिलेच्या मृतदेहाचा छडा लावण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. क्षुल्लक वादातून एका दुकानदाराने या महिलेची हत्या केल्याचं उघड झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेची हत्या केल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी पोलिसांनी याच परिसरातील शिवा नगरम चौधरी (वय ३०) याला अटक केली आहे. आरोपी शिवा याचं प्रिन्स नोव्हेल्टी हे दुकान आहे. तो या दुकानात मागील आठ महिन्यांपासून एकटाच राहत होता. या दुकानात ही महिला समान खरेदी करण्यास गेली असता तिची आणि शिवा याची बाचाबाची झाली त्यानंतर त्याचे रुपांतर झटापटीत झाले. शिवाने संबंधित महिलेचे केस ओढत तिला आतल्या रूममध्ये नेले आणि तिची गळा दाबून हत्त्या केली. त्यानंतर चाकूने तिच्या गळ्यावर वार केले.

सहायक पोलीस निरीक्षक संतोष गुर्जर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एका मोठ्या प्लास्टिकच्या पिशिवीत तिचा मृतदेह भरून चंदन नाका येथे उभ्या असलेल्या एका टेम्पोमध्ये फेकून दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 10:29 pm

Web Title: shocking rape of body after murder of woman in nalasopara aau 85
Next Stories
1 वाशीम जिल्ह्यात ७५ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी
2 धक्कादायक! शेतीच्या वादातून चुलत्याने केली दोन्ही पुतण्यांची खोऱ्याने ठेचून हत्या
3 साताऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षी सुरु होणार; अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास
Just Now!
X