News Flash

धक्कादायक : सोलापुरात करोना वॉर्डात सेवा बजाणाऱ्या डॉक्टरची आत्महत्या

छताच्या पंख्याला दोरीच्या सह्याने गळफास घेतला

प्रतिकात्मक छायाचित्र

सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात करोना वॉर्डात सेवेत असलेल्या एका आंतरनिवासिता डॉक्टरने आत्महत्या केली. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या हा प्रकार समोर आला. मात्र या आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप समजू शकले नाही.

चैतन्य अरूण धायफुले (वय २४) असे आत्महत्या केलेल्या नवप्रशिक्षित डॉक्टरचे नाव आहे. डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून त्याने एमबीबीएसचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर तो याच वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात इंटर्नशिप करीत होता.

रूग्णालयातील करोना वॉर्डात त्याची वैद्यकीय सेवा सुरू होती. सोमवारी रात्री चैतन्य हा करोना वॉर्डात होता. तेथील सेवा संपवून तो पहाटे रूग्णालयाच्या आवारातील मुलांच्या वसतिगृहात आला. दिवसभर तो आपल्या खोलीतच होता. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्याने खोलीतच छताच्या पंख्याला दोरीच्या सह्याने गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार उजेडात येताच त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास सदर बझार पोलीस करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 9:47 pm

Web Title: shocking suicide of a doctor serving in corona ward in solapur msr 87
Next Stories
1 आज बाळासाहेब हवे होते, राम मंदिर भूमिपूजनाआधी राज ठाकरेंनी व्यक्त केली भावना
2 सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणचीच चर्चा आणखी किती काळ? : हसन मुश्रीफ
3 यवतमाळ : करोना रूग्णाच्या ‘त्या’ ‘व्हिडीओ’ने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
Just Now!
X