महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातील अजरामर म्हैस सध्या रायगडात अवतरली आहे.  ‘म्हैस’ या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या अलिबाग तालुक्यातील चौल आणि बागमळा परिसरात सुरू आहे. चित्रपटाचे सत्तर टक्के चित्रीकरण पूर्ण झाले असून येत्या जून महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होईल, असा विश्वास चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर नाईक यांनी व्यक्त केला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांचा मेळा सध्या रायगडात भरला आहे. निमित्त आहे  ‘म्हैस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे. शेखर नाईक याच्या दिग्दर्शनाखाली या पु. ल. देशपांडे यांच्या अजरामर कथानकाला चित्रपटाच्या रूपात साकारण्याचे काम सध्या सुरू आहे. जितेंद्र जोशी, संजय मोने, उषा नाडकर्णी, सतीश आळेकर, जयंत सावरकर, कमलेश सावंत, अंशुमन जोशी, प्रीती घाडगे, दिलीप बापट, प्रमोद नलावडे यांसारख्या कलाकारांचा अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नितीन घोटकुळे हे चित्रपटाचे निर्माते आहेत, तर संवाद हे पु. ल. देशपांडे आणि संजय पवार यांचे असणार आहे. चित्रपटासाठी श्रीपाद सुपनेकर यांनी गीते लिहिली असून, संगीत अजय मोडक यांचे असणार आहे.
   पु. ल. देशपांडे यांचे साहित्य लहानपणापासूनच वाचत आलोय. त्यांच्या म्हैस या कथानकावर चित्रपट करण्याचे मी यापूर्वीच ठरवले होते. याच उद्देशाने २००८ मध्ये पुलंच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे यांच्याकडून मी म्हैस कथेवर चित्रपट बनवण्याचे
हक्क विकत घेतले होते. कथेचा आशय न बदलता मी कॉपी तयार करण्याचे काम करत असल्याचे दिग्दर्शक शेखर नाईक यांनी सांगितले. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला. याच कथेवर चांदी नामक या चित्रपटांची निर्मिती केली जाते आहे. मात्र या चित्रपटाचा आमच्या चित्रपटावर काही फरक पडणार नाही. प्रेक्षकांना ‘पुलंची म्हैस’च आवडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
    या चित्रपटात जितेंद्र जोशी हा देशपांडेच्या भूमिका साकारताना दिसणार आहे. पु. ल. देशपांडे यांची ‘म्हैस’ कथा ही गाजलेली कथा आहे. मात्र ही कथा निवेदनात्मक स्वरूपात आहे. त्याचे त्रिनिर्मितीकरण करून चित्रपटाच्या स्वरूपात साकारण्याचे शिवधनुष्य निर्माता आणि दिग्दर्शकांनी उचलले आहे. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना साथ देण्याचे काम आपण करत असल्याचे अभिनेता जितेंद्र जोशी यांनी व्यक्त केला.   
  चित्रपटाचे चित्रीकरण उत्तम प्रकारे सुरू आहे. त्याचा आनंद सध्या आम्ही घेत असल्याचे अभिनेते संजय मोने यांनी सांगितले.
या चित्रपटात आपण ज्या व्यक्तिरेखेचा सामान्य माणसाशी काही संबध येत नाही, अशा ऑर्डरलीची भूमिका साकारत असल्याचे मोने यांनी सांगितले.
 चित्रपटाची कथा जुनी असली, त्यातील विनोद जुने असले, तरी लोकांना ते नक्की आवडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे
usha mehta congress radio
ब्रिटिशांना आपल्या आवाजाने ‘सळो की पळो’ करून सोडणार्‍या उषा मेहतांची कहाणी