गडचिरोली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी प्रंचित पोरेड्डीवार
वार्ताहर, गडचिरोली
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्रंचित अरविंद पोरेड्डीवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी श्रीहरी भंडारीवार व मानद सचिवपदी अनंत साळवे यांची वर्णी लागली.
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. यात सर्व २१ संचालक अरविंद पोरेड्डीवार गटाचे विजयी झाले. विशेष म्हणजे, यातील २० संचालक बिनविरोध निवडून आले. या संचालकांमधून अध्यक्ष, उपाध्यक्ष व मानद सचिवपदासाठी जिल्हा उपनिबंधक जयेश आहेर यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदी प्रंचित अरविंद पोरेड्डीवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सिरोंचा येथील श्रीहरी भंडारीवार, तर मानद सचिवपदी धानोरा येथील अनंत साळवे बिनविरोध निवडून आले. निवडणुकीनंतर बँकेचे माजी अध्यक्ष व संचालक प्रकाश सावकार पोरेड्डीवार व अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी बँकेच्या आतापर्यंतच्या वाटचालीची माहिती दिली. बँकेने सहा महिन्यापूर्वी महिला समृद्धी योजना सुरू केली असून ग्रामीण भागातील ४८ हजार महिलांचे बचत खाते उघडण्यात आले आहे. बँक त्यांना रोजगारासाठी कर्ज देणार आहे. कॅश क्रेडिटच्या कर्ज मर्यादेत २५ लाखापर्यंत वाढ करण्यात आली आहे. बोदली, नवेगांव, वडसा व चामोर्शी येथील विस्तार कक्षांचे पूर्ण शाखेत रूपांतर करण्यास नाबार्डने हिरवी झेंडी दाखविल्याची माहिती दिली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी बँकेची व योजनांची माहिती दिली.

दिग्रस येथे जिनिंगला आग
यवतमाळ : मानोरा अंबिका एॅग्रो इंडस्ट्रीजच्या जििनगला काल, शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान अचानक आग लागल्याने १५०० िक्वंटल कापूस व उभा असलेला एक ट्रक जळून खाक झाल्याने चांगलीच खळबळ उडाली. तीन तासानंतर दिग्रस, पुसद, उमरखेड, दारव्हा व यवतमाळ येथील अग्निशमन दलाच्या पथकांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोवर ६५ लाख रुपयांचा कापूस व ट्रक हा जळून खाक झाला. या दरम्यान उपजिल्हाधिकारी दीपक मीना, तहसीलदार कोहरे, नगरपरिषद मुख्याधिकारी विठ्ठल कुमरे यांनी भेट दिली. येथील सुभाष अटल हे अंबिका एॅग्रो इंडस्ट्रीजचे मुख्य भागीदार असून त्यांच्या जिंनिगला तीन वर्षांपूर्वी व आता दुसऱ्यांदा आग लागल्याने उलटसुलट चर्चा आहे.

नौशाद खून प्रकरणात चौघांनाही आजन्म कारावास
यवतमाळ : बहिणीच्या छेडखानीचा जाब विचारणाऱ्या भावाचा खून केल्याच्या आरोपावरून नेर येथील चार आरोपींना येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.व्ही. ठाकरे यांनी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सनाउल्ला खा अहमद खा पठाण (१९), मोहम्मद वसरम उर्फ भुऱ्या मो. सलीम (२३), मोहम्मद हसीम मो. सलीम (२२), मो. नईम मो. सलीम (१९, सर्व रा. वल्ली साहेबनगर नेर) अशी आरोपींची नावे आहेत. १७ जून २०११ रोजी शेख रहीम यांच्या घरात आरोपी सनाउल्ला खान याने प्रवेश करून मािलदी नावाच्या तरुणीची छेड काढली होती. या घटनेची तक्रार मािलदीने आपल्या नौशाद आणि इर्शाद या भावांजवळ केली होती. सनाउल्ला खान याला जाब विचारण्यास गेलेल्या या दोन्ही भावांवर सनाउल्ला व मोहम्मद वसीम, मोहम्मद हसीम, मोहम्मद नईम या चौघांनी रॉड व काठीने प्राणघातक हल्ला चढविला. त्यात नौशाद ठार झाला व इर्शाद जखमी झाला. या प्रकरणी गुलणाज परविन शेख रिजवान यांनी दिलेल्या तक्रारीवरून नेर पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध तपास अधिकारी पोलीस निरीक्षक वाघू खिल्लारे यांनी खटला दाखल केला होता. सरकारी पक्षाच्या वतीने शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. पी.व्ही. गाडबले यांनी काम पाहिले.

एटापल्ली तालुक्यात नक्षल्यांचा कट उधळला
वार्ताहर, गडचिरोली<br />एटापल्ली उपविभागांतर्गत गोपनीय माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस पार्टी नक्षलविरोधी अभियान राबवित असताना पोलीस मदत केंद्र येमली बुर्गी हद्दीत उडेरा जंगल परिसरात सशस्त्र बंदुकधारी नक्षलवादी घातपाताच्या इराद्याने जंगलात दबा धरून बसलेले असताना सकाळी ८ ते ८.३० च्या दरम्यान नक्षलवाद्यांनी पोलिसांवर भ्याड हल्ला केला. पोलिसांनी नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. पोलिसांचा वाढता दबाव पाहून जंगलाचा फायदा घेत नक्षलवादी पसार झाले. या भागात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे.