News Flash

राज्यातील सर्व गुन्ह्यांची उकल ‘एनआयए’ने करावी काय? – केशव उपाध्ये

राज्य सरकारच्या तपास यंत्रणांवर कोणाचे दडपण आहे? असा देखील सवाल केला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

युरेनियमचा बेकायदा साठा मिळवून तो चढ्या दराने विकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन तरुणांना काही दिवसांपूर्वी दहशतवाद विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा पुढचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्यात आला आहे. यावरून भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर निशाणा साधल्याचं दिसून येत आहे.

“राज्य सरकारच्या थंड कारभाराचा आणखी एक नमुना. मुंबईत सापडलेल्या युरेनियम प्रकरणात तब्बल तीन महिन्यांचा वेळकाढूपणा झाल्यानंतर अखेर तपास एनआयएने ताब्यात घेतला. राज्यातील साऱ्या गुन्ह्यांची उकल एनआयएने करावी काय.. राज्य सरकारच्या तपास यंत्रणांवर कोणाचे दडपण आहे?” असं केशव उपाध्ये यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने(NIA) या प्रकरणातल्या आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. जिगर पांड्या आणि अबू ताहीर अशी या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी सात किलो १०० ग्रॅम युरेनियमचा साठा मानखुर्दमधल्या एका कारखान्यात लपवून ठेवला होता. हे दोघेही गेल्या वर्षभरापासून हा साठा विकण्यासाठी गुप्तपणे ग्राहक शोधत होते. त्याचबरोबर त्यांनी या साठ्याची किंमत २५ कोटींपर्यंत असल्याचं काही विश्वासू व्यक्तींना सांगितलं होतं. ही बाब दहशतवाद विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरिक्षक संतोष भालेकर यांच्या खबऱ्याच्या लक्षात आली आणि त्याने ही माहिती दिली.

मोठी बातमी…..मुंबईतलं युरेनियम प्रकरण आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे!

या प्रकरणातले दोन्ही आरोपी हे उच्चशिक्षित आहेत. ते एमबीए पदवीधारक आहेत. जिगर हा एका खासगी आयटी कंपनीत काम करतो तर ताहीर हा आयात-निर्यात व्यावसायिक आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेलं युरेनियम ९० टक्के नैसर्गिक आणि शुद्ध असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत २१ कोटींहूनही अधिक असेल असा अंदाज आहे. या आरोपींना १२ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आहेत. ह्या प्रकरणासंदर्भातली अधिक चौकशी आता राष्ट्रीय तपास यंत्रणा करणार आहे. त्यांनी अणुउर्जा कायद्यातल्या कलमानुसार या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा- मुंबईत सात किलो युरेनियम जप्त

किरणोत्सारी गुणधर्म आणि आरोग्यास घातक असल्याने शासनाने युरेनियमला प्रतिबंधित पदार्थ म्हणून जाहीर के ले. झारखंड, आंध्र प्रदेश येथे युरेनियमच्या खाणी होत्या. त्यापैकी झारखंड येथील युरेनियम उत्खनन शासन नियंत्रणात सुरू आहे. युरेनियमचा वापर अणुऊर्जा प्रकल्प, अणू संशोधनासह क्ष-किरण शास्त्राशी (रेडिओलॉजी) संबंधित उपकरणांमध्ये होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 2:37 pm

Web Title: should nia solve all crimes in the state keshav upadhye msr 87
Next Stories
1 संजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही अन् ‘सामना’ही वाचत नाही -नाना पटोले
2 मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकरचा अपघात; वाहतूक विस्कळीत
3 खासदार निधी गोठवला असताना कुमार केतकर पैसे कसे देऊ शकले?
Just Now!
X