राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे हे त्यांच्या वाढदिवसाच्या केकवरून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अणेंच्या वाढदिवसाला कापण्यात आलेल्या केकची सध्या नागपुरमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे. या केक कटिंगचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरलही झाला आहे. या व्हिडिओत श्रीहरी अणे महाराष्ट्राचा नकाशा असलेला केक कापताना दिसत आहेत. यावेळी स्वतंत्र विदर्भाचा पुरस्कार करणाऱ्या अणेंनी केकमधील विदर्भाचा भाग सुरीने कापून विलग केला. अणे यांच्या या कृतीमुळे पुन्हा एकदा वाद रंगण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या गुढीपाडव्या मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी श्रीहरी अणेंवर सडकून टीका केली होती. अणेंसारख्या लोकांना महाराष्ट्राचे तुकडे करायला तो वाढदिवसाचा केक वाटला काय, असे वक्तव्य केले होते. त्यामुळेच राज ठाकरेंना दाखवण्यासाठी आपण हा केक कापत असल्याचे सांगत अणेंनी यावेळी राज यांना आव्हान दिले. अणेंच्या या कृतीवर शिवसेनाही संतप्त झाली असून हिम्मत असेल तर अणेंनी गुजरातचा असा केक कापून दाखवावा असा टोलाही शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी लगावला आहे. आम्ही आमच्या पद्धतीने आमची चळवळ सुरुच ठेवू असे श्रीहरी अणे यांनी सांगितले. अणेंच्या या कारनाम्यावर मनसेने आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. अणेंना चोपूनच काढले पहिजे. केक सारखे अणे यांना देखील कापले पाहिजे. मनसे अणेंना आपल्या स्टाईलने उत्तर देईल अशी संतप्त प्रतिक्रिया मनसे गटनेता संदिप देशपांडे यांनी दिली आहे.

Piyush Goyal on Elon Musk Tesla
टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? पियुष गोयल यांचं ‘मनोज कुमार’ स्टाइल हटके उत्तर
chandrashekhar bavankule raj thackeray marathi news
मोदींना साथ देण्यासाठी राज ठाकरे यांनी महायुतीसोबत यावे – बावनकुळे
Kolhapur Election Hatkanangle LokSabha Constituency
उमेदवाराला विजयी करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची ‘मिसळ पे चर्चा’; कोल्हापूरसाठी ठरली ‘ही’ रणनीती
Chhagan Bhujbal and anjali damania
Maharashtra Sadan Scam: छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? अंजली दमानिया यांच्या पाठपुराव्याला यश, नेमकं प्रकरण काय?