News Flash

अणेंनी फडकावला स्वतंत्र विदर्भाचा झेंडा

अणेंनी आज नागपूरच्या विष्णुजी की रसोई, बजाजनगर येथे स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकावला.

संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असताना स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करणारे नेते आजचा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करत आहेत. राज्याचे माजी महाधिवक्त श्रीहरी अणेंनी आज नागपूरच्या विष्णुजी की रसोई, बजाजनगर येथे स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकावला. यावेळी अणेंसह अन्य नेतेही उपस्थित होते.
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी या विदर्भवादी नेत्यांनी विविध कार्यक्रम आखले आहेत. कस्तुरचंद पार्क मैदानावर आकाशात काळे फुगे सोडण्यात आले. त्यावर ‘जय विदर्भ’ असे लिहीले होते.
दरम्यान, स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी शहरात एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली. एका तरुणाने एसटी डेपोमध्ये पाच एसटी बसेसची तोडफोड केली. सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. युवराज साळवी असे या तरुणाचे नाव असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2016 11:28 am

Web Title: shreehari aney hoisted separate vidharbh flag
Next Stories
1 मलालाच्या नोबेलवर श्री श्री रविशंकर यांची नाराजी
2 भाजपला यापुढे बहुमत मिळणे अशक्य – अणे
3 आमदार सावंत यांना २ वर्षांची सक्तमजुरी
Just Now!
X