30 March 2020

News Flash

महाराष्ट्रातील कर्तव्यदक्ष अधिकारी श्रीकर परदेशींना पंतप्रधान कार्यालयात बढती

कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील आयुक्तपदाच्या कार्यकाळात चर्चेत आलेले श्रीकर परदेशी यांना पंतप्रधान कार्यालयात बढती देण्यात आली आहे

| April 1, 2015 11:35 am

कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील आयुक्तपदाच्या कार्यकाळात चर्चेत आलेले श्रीकर परदेशी यांना पंतप्रधान कार्यालयात बढती देण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून मंगळवारी रात्री यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला. त्यानुसार पुढील चार वर्षांसाठी श्रीकर परदेशी यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती झाली आहे. २००१च्या आय.ए.एस. बॅचचे अधिकारी असणाऱ्या श्रीकर परदेशींची महाराष्ट्रात एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील त्यांची कारकिर्द विशेष गाजली होती. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्याविरोधात उघडलेल्या जोरदार मोहिमेमुळे परदेशी यांना मोठ्या राजकीय रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्थानिक नेत्यांच्या दबावामुळे अवघ्या १८ महिन्यांत त्यांना आयुक्तपदावरून दूर सारण्यात आले होते. त्यानंतर परदेशी यांची बदली रद्द करण्यासाठी शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांनी आंदोलन केले होते. आंदोलनानंतर त्यांच्यावर नोंदणी मुद्रांक शुल्क विभाग आणि पीएमपीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
श्रीकर परदेशी यांच्यासह गुलजार नटराजन, ब्रिजेश पांडे, मयुर महेश्वरी या तीन आय.ए.एस. अधिकाऱ्यांनाही पंतप्रधान कार्यालयात नियुक्त करण्यात आले आहे. गुलजार नटराजन यांच्याकडे पंतप्रधान कार्यालयाच्या संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

… अखेर श्रीकर परदेशी यांची बदली; पुण्याच्या आयुक्तपदी विकास देशमुख

श्रीकर परदेशी यांच्या बदलीच्या निषेधार्थ संस्था, संघटना व सर्व पक्षांचे आंदोलन

मुद्रांक शुल्क विभागासाठी चांगल्या अधिकाऱ्याची गरज होती- अजित पवार

..आणि कार्यक्षमतेचे कौतुकही

डॉ. श्रीकर परदेशी यांचा ‘ई-मेल’ हॅक झाल्याचे उघड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2015 11:35 am

Web Title: shrikar pardeshi appointed as deputy secretary in pmo
टॅग Maharashtra
Next Stories
1 माजी आमदार सा.रे. पाटील यांचे निधन
2 दारूबंदीची कठोर अंमलबजावणी केल्यास एक हजार कोटींचा वार्षिक फायदा – डॉ. बंग
3 बिगर परवाना खाद्यपदार्थ विक्रेत्यांना ६० लाखांचा दंड
Just Now!
X