07 April 2020

News Flash

श्रीवर्धन : कोंडविळी समुद्र किनारी मगर दिसल्याने खळबळ

काही काळ किनाऱ्यावर दिसल्यानंतर पुन्हा समुद्रात लुप्त

श्रीवर्धन तालुक्यातील कोंडविळे गावच्या समुद्रकिनाऱ्यावर बुधवार सकाळी एक मगर मुक्त संचार करताना आढळून आली. समुद्र किनाऱ्यावर मुक्त संचार करणारी ही मगर पाहील्यानंतर पर्यटक आणि ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली.

समुद्र किनारी समुद्राच्या लाटांसह एक जिवंत मगर अचानक आढळल्याने काही काळ पळापळही झाली. ही मगर समुद्र किनारावरील रेतीमध्ये चालताना पाहताचं पर्यटक आणि ग्रामस्थांनी गर्दी केली.  मगर नक्की कोठून आली? हा प्रश्न तेथील ग्रामस्थांना पडला. काही ग्रामस्थांनी तिला पकडण्याचाही धाडसी प्रयत्न केला पण, अतिशय चपळ व अजस्त्र असणारी ही मगर हाती लागली नाही. काही वेळातच ती पुन्हा समुद्राच्या लाटांमध्ये निघून गेली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या मगरीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र, ती आढळून आली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2019 7:07 pm

Web Title: shrivardhan crocodile found on beach msr 87
Next Stories
1 आमचं सरकार आल्यास तात्काळ कर्जमाफी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार – अजित पवार
2 पिकविमा कंपन्यांवर कोणाचा वरदहस्त?
3 पुराच्या पाण्याखाली गेलेल्या गावांचे नवीन जागेत पुनर्वसन करणार : चंद्रकांत पाटील
Just Now!
X