वैद्यकीय उपचारासाठी मिरजेत आलेल्या रुग्ण तरुणाला मालट्रकने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. शुक्रवारी सकाळी ही घटना मिरजेतील डॉ. आंबेडकर उद्यानानजीक घडली.
चंद्रकांत आण्णाप्पा जाधव (वय २९, रा. बहेगिरी, ता. अथणी) हा रुग्ण उपचारासाठी मिरजेत आला होता. बस स्थानकावरून तो चालत रुग्णालयाकडे जात असताना मागून येणा-या माल ट्रक (एम. एच. १४. बी.जे. २३१०) याने त्याला ठोकरले. त्यात तो जागीच ठार झाला. या घटनेची माहिती ट्रक चालकाने स्वत पोलीस ठाण्यात येऊन दिली.