30 September 2020

News Flash

तिवरे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सिद्धिविनायक ट्रस्टकडून ५ कोटींचा धनादेश सुपूर्द

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार सिद्धिविनायक ट्रस्टच्या विश्वस्तांच्या बैठकीत हा निधी देण्याचा निर्णय झाला होता.

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सिद्धिविनायक ट्रस्टच्यावतीनं ५ कोटी रुपयांचा धनादेश ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या हस्ते पालकमंत्री अनिल परब आणि खासदार विनायक राऊत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुंबईच्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टच्यावतीनं रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे ५ कोटी रुपयांचा धनादेश पालकमंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत यांच्याकडे सुपूर्द केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार सिद्धिवनायक ट्रस्टच्या विश्वस्तांच्या बैठकीत हा निधी देण्याचा निर्णय झाला होता. या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्र शासन अध्यादेशानुसार ५ कोटी रूपयांचा धनादेश ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या हस्ते जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राउत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी सिद्धिविनायक ट्रस्टचे कोषाधक्ष सुमंत घैसास, विश्वस्त संजय सावंत, गोपाळ दळवी उपस्थित होते.

सिद्धिविनायक ट्रस्टने केलेल्या या मदतीबद्दल पालकमंत्री आणि खासदारांनी बांदेकर आणि विश्वस्तांसह ट्रस्टचे रत्नागिरीवासियांच्यावतीने आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 9:42 am

Web Title: siddhivinayak trust hands over rs 5 crore check for rehabilitation of tiwari dam victims aau 85
Next Stories
1 Lockdown: सहा लाख पर्यटकांनी घरबसल्या बघितले ‘ताडोबा’; ‘ऑनलाइन’ सफारीचा उपक्रम यशस्वी
2 “खडसे, पंकजा मुंडे, तावडे यांच्या तगमगीतून भूकंपाची वात पेटू नये म्हणून विरोधकांनी सावध राहावं”
3 Coronavirus : सोलापुरात करोनाबाधित रुग्णसंख्या ३४३
Just Now!
X