News Flash

नाशकात सिद्ध समाधी योग वर्ग

श्री ऋषी संस्कृती विद्या केंद्र या स्वयंसेवी संस्थेतर्फे येथे १३ ते २७ जानेवारीदरम्यान इंदिरानगर व शालिमार येथील नाशिक जिमखाना सिद्ध समाधी योग वर्गाचे आयोजन करण्यात

| January 11, 2013 06:06 am

श्री ऋषी संस्कृती विद्या केंद्र या स्वयंसेवी संस्थेतर्फे येथे १३ ते २७ जानेवारीदरम्यान इंदिरानगर व शालिमार येथील नाशिक जिमखाना सिद्ध समाधी योग वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. ताणतणावातून आनंदाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे सिद्ध समाधी योग आहे. विचारग्रस्त व तणावाखाली असणाऱ्या मनाला शांत करण्याची एक शास्त्रशुद्ध पद्धती म्हणजे हा योग आहे, असे संस्थेचे पूर्णवेळ कार्यकर्ते सुहास फडके यांनी म्हटले आहे. इंदिरानगर येथील मोदकेश्वर मंदिराजवळ सकाळी सहा वाजता, तर नाशिक जिमखाना येथे सायंकाळी साडेसहा वाजता हा वर्ग होईल. हसण्याची, रडण्याची, गाण्याची, नृत्याची क्षमता म्हणजे हा योग असून १४ वर्षे वयोगटापुढील कोणीही त्यात सहभागी होऊ शकतो. यातून मधुमेह, रक्तदाब, सांधेदुखी, निद्रानाश, आम्लपित्त, स्थूलता, हृदयविकार या आणि अशा प्रकारच्या मानसिक तणावामुळे होणाऱ्या विकारांवर आराम पडू शकतो, असे फडके यांनी म्हटले आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी हेतल दीक्षित ९८९०७००७०६ अथवा योगिता अमृतकर ०२५३-२३७९००० यांच्याशी संपर्क साधावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2013 6:06 am

Web Title: sidha samadhi yog classes in nashik
टॅग : Nashik
Next Stories
1 ‘आदित्य डेंटल’च्या विद्यार्थिनींचे आंदोलन
2 एसटी कर्मचाऱ्यांची सामूहिक रजा प्रवाशांच्या मुळावर!
3 वादाचा परशू दूर..!
Just Now!
X