जैन समाजामध्ये अन्नत्याग आणि त्यातून समाधी घेण्याचा प्रकार प्राचीन काळापासून सुरू आहे. जैन धर्मामध्ये २४ तीर्थकारांनी अन्नत्याग करून समाधीस्थ झाले आहे. त्यामुळे राजस्थान उच्च न्यायालयाने घेतलेला हा निर्णय जैन समाजावर अन्याय करणारा आणि समाजाच्या आस्थेला धक्का बसणारा आहे. हा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी करीत जैन समाजाने सेंट्रल अ‍ॅव्हेन्यू मार्गावरील गांधी पुतळ्याजवळून जैन धर्म गुरू प्रसन्न सागस्ती महाराज यांच्या नेतृत्वाखाली मौन रॅली काढून निषेध केला.
यावेळी मोठय़ा प्रमाणात जैन समाजातील नागरिक रॅलीमध्ये सहभागी झाले. जैन धर्मातील धार्मिक विधी संथाराला गुन्हा ठरविणाऱ्या राजस्थान न्यायालयाचा निर्णय रद्द करावा, जैन धर्म अन्याय सहन करणार नाही, यासाठी मोर्चा कस्तुरचंद पार्कमध्ये पोहचला. त्या ठिकाणी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
जैन समाजामध्ये अन्नत्याग आणि त्यातून समाधी घेण्याचा प्रकार प्राचीन काळापासून सुरू आहे. जैन धर्मामध्ये २४ तीर्थकारांनी अन्नत्याग करून समाधीस्थ झाले आहे. त्यामुळे राजस्थान उच्च न्यायालयाने घेतलेला हा निर्णय जैन समाजावर अन्याय करणारा आणि आस्थेला धक्का देणारा आहे. अन्न त्याग करून समाधी घेणाऱ्यांवर धाारा ३०६ अंतर्गत आत्महत्येचा गुन्हा दाखल करणार म्हणजे हा सर्व हिंदू समाजावर केलेला अन्याय आहे. याला सतीप्रथेशी जोडण्यात आले आहे. संसारामध्ये सर्व इच्छा पूर्ण झाल्यावर देवाचे नामस्मरण व शुद्ध परिणाम ठेवून स्वच्छेने अन्यत्याग करून समाधी घेणे हे समाजाचे एक व्रत आहे. प्राचीन काळामध्ये अनेक संतांनी अन्नत्याग करून समाधी घेतल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे या प्रकाराला आत्महत्येमध्ये मोडून गुन्हा दाखल करणे म्हणजे समाजावर अन्याय असून हा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.