12 December 2019

News Flash

साटमवाडी ग्रामविकास मंडळाचा रौप्यमहोत्सव संपन्न

मंडळाचे अध्यक्ष अमृत साटम यांनी प्रास्ताविक केले.

मालवण तालुक्यातील चिंदर गावच्या साटमवाडी ग्रामविकास मंडळाचा रौप्यमहोत्सव अत्यंत दिमाखदार सोहळ्याने संपन्न झाला. यावेळी लघुरुद्र, होमहवन, साईबाबांच्या मूर्तीवर अभिषेक, हळदीकुंकु समारंभ, दिंडीनृत्य, महिला डबलबारी भजन, महिलांच्या फुगडय़ा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच नामांकित गायकांची सुस्वर भजने पार पडली.

यावेळी एका आकर्षक स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समिती सभापती हिमली अमरे, उपसरपंच अनिल गांवकर, पोलीसपाटील दिगंबर पाताडे, चिंदर भटवाडी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरुण नाटेकर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य आत्माराम नाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मंडळाचे अध्यक्ष अमृत साटम यांनी प्रास्ताविक केले. सचिव विश्वास साटम यांनी आभार मानले. कार्याध्यक्ष संजय साटम यांनी सूत्रसंचालन केले. यशवंत साटम, ज्ञानू साटम, राजेंद्र साटम, सुरेश साटम यांनी या कार्यक्रमासाठी अतिशय मेहनत घेतली.

First Published on May 16, 2016 1:27 am

Web Title: silver jubilee celebration satmwadi rural development board on sawantwadi
टॅग Sawantwadi
Just Now!
X