News Flash

सिनाकोळेगाव धरण चार वर्षांनी झाले ओव्हर फ्लो!

शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

उस्मानाबादमधले सर्वाधिक मोठा असलेला सिनाकोळेगाव धरण चार वर्षानंतर ओव्हर फ्लो झाला आहे धरणाच्या चार दरवाजांतून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे . धरण शंभर टक्के भरल्याने शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन या धरणातील पाण्यामुळे परंडा -करमाळा तालुक्यातील अनेक खेडेगावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटून सिंचन क्षेत्र वाढणार आहे

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत परंडा-करमाळा तालुक्याच्या सिमेवर आवाटी डोमगावच्या मध्यभागी सिनाकोळेगाव धरण बांधण्यात आले असून या धरणातील पाण्यामुळे उस्मानाबाद जिल्हयातील परंडा आणि सोलापूर जिल्यातील कामाळा या दोन तालुक्यातील शेती सिंचनाखाली आली आहे त्यामुळे हे दोन्ही तालुके सुजलाम सुफलाम होणार आहेत . या धरणातील पाणी शेतीतून कधी वाहणार याचीच उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे.

सिनाकोळेगाव धरणातील पाण्यामुळे परंडा तालुक्यातील ८ हजार ७०० हेक्टर तर करमाळा तालुक्यातील ३ हजार ४०० हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक वर्षांपासुनचे हरित क्रांतीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. सिनाकोळेगाव धरण साडेपाच टीएमसीचे असुन या धरणाला २१ दरवाजे असुन ३ उपसा सिंचन पंपग्रह तयार आहेत . सिनाकोळेगाव धरणामुळे औद्योगिक विकास होणे अपेक्षित आहे.

सिनाकोळेगाव खासापुरी, चांदणी धरणातील पाण्यामुळे परंडा -करमाळा -बार्शी सह अनेक खेडेगावातील नागरीकांचा पिण्याच्या पाण्याचा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे . सिनाकोळेगाव धरणातील पाण्यामुळे परंडा -करमाळा तालुक्यात सिंचन क्षेत्र वाढणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 4:20 pm

Web Title: sina kolegaon dam in osmanabad over flow four gates open scj 81
Next Stories
1 उद्यापासून मुंबई मेट्रो सुरु, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; नवी नियमावली जाहीर
2 तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही अन् तुम्ही…; चंद्रकांत पाटलांना राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर
3 …त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामाच दिला पाहिजे; भाजपाची मागणी
Just Now!
X