सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचा दहावीचा निकाल ९७.४६ टक्के लागला. जिल्ह्य़ात १३ हजार ३१६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १२ हजार ९९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यात ९७ शाळांचा निकाल १०० टक्के जाहीर झाला.

मालवण तालुक्याचा दहावीचा निकाल ९६.६३ टक्के जाहीर झाला. एक हजार ५७२ विद्यार्थ्यांपैकी एक हजार ५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील १६ शाळांचा १०० टक्के निकाल लागला.

देवगड तालुक्याचा ९७.१८ टक्के निकाल जाहीर झाला. दोन हजार ९६ विद्यार्थ्यांपैकी दोन हजार ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बाकी शाळांचा १०० टक्के निकाल जाहीर झाला.

दोडामार्ग तालुक्याचा ९६.६४ टक्के निकाल जाहीर झाला. येथे ५६६ विद्यार्थ्यांपैकी ५४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आठ शाळांचा १०० टक्के निकाल जाहीर झाला.

कणकवली तालुक्याचा ९८.०९ टक्के निकाल जाहीर होऊन ११ शाळांता १०० टक्के निकाल जाहीर झाला.

कुडाळ तालुक्याचा ९७.३८ टक्के निकाल जाहीर झाला. १३ शाळांचा १०० टक्के निकाल जाहीर झाला.

सावंतवाडी तालुक्याचा ९८.२५ टक्के निकाल जाहीर झाला. दोन हजार ५११ विद्यार्थ्यांपैकी दोन हजार ४६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २३ शाळांचा १०० टक्के निकाल जाहीर झाला.

वैभववाडी तालुक्याचा ९५.५५ टक्के निकाल जाहीर झाला. येथे ७६४ विद्यार्थ्यांपैकी ७३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सहा शाळांचा १०० टक्के निकाल लागला.

वेंगुर्ले तालुक्याचा ९८.१६ टक्के निकाल जाहीर झाला. एक हजार ८६ पैकी १ हजार ६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आठ शाळांचा १०० टक्के निकाल लागला.

सावंतवाडीच्या कळसुलकर इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी तनया वाडकर हिने १०० टक्के गुण मिळवून यश संपादन केले हे.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचा ९७.४६ टक्के निकाल जाहीर झाला. जिल्ह्य़ातील ९७ शाळांचा निकाल १०० टक्के जाहीर झाल्याने सिंधुदुर्गच्या विद्यार्थिनी विद्यापीठात जिल्ह्य़ाला मान मिळवून दिला. तसेच विद्यार्थ्यांनी १०० टक्के यश संपादन करून ग्रामीण भागातील झलक दाखवून दिली.